फुटबाॅल सिझनची सुरुवात काल इंग्लंडमध्ये प्रिमीयर लीग पासुन झाली आणि अवघ्या २ दिवसात सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे शेवटच्या मिनिटापर्यंत प्रत्येक सामन्याचा निकाल काय असेल ते सांगने अवघड जात आहे.
लीगची सुरुवात काल अर्सेनाल विरुद्ध २ वर्षापुर्वीची विजेती लिचेस्टर सिटीने झाली आणि दुसऱ्याच मिनिटाला अर्सेनालने गोल केला. त्याला लिचेस्टरने ३मिनिट नंतर सामन्याच्या ५व्या मिनिटला गोल उत्तर दिले. हाफ टाईमला २-२ ने बरोबरीत असलेल्या मॅचला लिचेस्टरकडुन वार्डीने गोल करत २-३ अशी बढत मिळवुन दिली पण अर्सेनालने शेवटच्या १० मिनिटांमध्ये २ गोल करत ४-३ असा विजय मिळवला.
दुसऱ्या वॅटफोर्ड विरुद्ध लिवरपुल सामन्यातसुद्धा शेवटच्या (९३) व्या मिनिटला गोल करुन वॅटफोर्ड ने ३-३ ने बरोबरी केली.
आज झालेल्या सामन्यात गतविजेता चेल्सीला २-३ असा बर्न्लीकडुन धक्कादायक पराभव स्विकारावा लागला. १४ व्या मिनिटला चेल्सीच्या काहिलला आणि ८१ व्या मिनिटला फॅबरिगासला रेड कार्ड दिले. पहिल्या हाफमध्ये चेल्सी ०-३ अशा पिछाडीवर होती, दुसर्या हाफ मध्ये चेल्सी तर्फे मोराटाने ६९ व्या आणि डेविड लुईझने ८८ व्या मिनिटला गोल करुन कमबॅकचा प्रयत्न केला पण त्यांना २-३ असा पराभव स्विकारावा लागला.
या स्पर्धेची क्रेझ इतकी आहे की भारतीय स्टार क्रिकेटर रोहित शर्माने सुद्धा ट्विट करुन आपली ईपीएल बद्दलची उत्सुकता दाखवली आहे.
England's biggest drama series has begun @premierleague @OfficialFPL get ready to take your tissues out guys @tmishra22 @dhawal_kulkarni 😂
— Rohit Sharma (@ImRo45) August 12, 2017