भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कालपासून चेन्नईच्या मैदानावर खेळवला जात आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने सहज विजय मिळवला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघावर कमालीचे दडपण होते. मात्र हे दडपण हाताळत भारताने दुसऱ्या सामन्यात आत्तापर्यंत तरी वर्चस्व गाजवले आहे.
पहिल्या डावात नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना भारताने ३२९ धावा केल्या होत्या. आणि त्यानंतर फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यामुळे इंग्लंडचा डाव अवघ्या १३४ धावांवर गुंडाळला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात १९५ धावांची आघाडी मिळाली आहे. मात्र इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनने ट्विट करत भारताच्या या कामगिरीचे श्रेय नाणेफेकीला दिले आहे.
“अशी खेळपट्टी तयार करणे धाडसी”
केव्हिन पीटरसनने ट्विट करताना दुसऱ्या सामन्यातील खेळपट्टी आणि नाणेफेकीबद्दल आपले मत मांडले. पीटरसनने फिरकीला पहिल्या दिवसापासून मदत करणारी खेळपट्टी पाहून आश्चर्य व्यक्त केले. मालिकेत ०-१ असे पिछाडीवर असतांना अशी खेळपट्टी तयार करणे, हा धाडसी निर्णय असल्याचे पीटरसन म्हणाला.
तसेच भारताने नाणेफेक हरली असती, तर हा सामनाही हरला असता आणि मालिकेत ०-२ असा पिछाडीवर पडला असता, अशी पुस्तीही त्याने जोडली. थोडक्यात, या सामन्यात प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याने भारत सुदैवी ठरला. अन्यथा पहिल्या सामन्यासारखीच स्थिती या सामन्यातही पाहायला मिळाली असती, असे पीटरसनने म्हंटले आहे.
https://twitter.com/KP24/status/1360874504256372739
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. दुसऱ्या दिवशी ६ बाद ३०० धावांवरून डाव पुढे सुरु करताना रिषभ पंतच्या फटकेबाजीने भारताने ३२९ धावांची मजल मारली. या धावसंख्येच्या प्रत्युतरात खेळायला उतरलेल्या इंग्लंडच्या एकही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे इंग्लंडचा डाव १३४ धावांवर संपुष्टात आला. यासह भारताने पहिल्या डावात १९५ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या:
शाब्बास अज्जू! चित्त्याच्या चपळाईने डाइव्ह मारत रहाणेने टिपला भन्नाट झेल, एकदा व्हिडिओ पाहाच
स्पायडरमॅन नाही सुपरमॅन! हवेत सूर मारत पंतने घेतला लाजवाब झेल, पाहा व्हिडिओ