---Advertisement---

रायपूरमध्ये टीम इंडियाची मालिकाविजयावर नजर, ऑस्ट्रेलियासमोर मालिका जिवंत ठेवण्याचे आव्हान

On: गुरूवार, नोव्हेंबर 30, 2023 8:08 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तीन सामने पार पडले असून भारतीय संघ सध्या 2-1 असा आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी (1 डिसेंबर) खेळला जाईल. रायपूर येथे होणार आहे या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल.

सूर्यकुमार यादव याचे नेतृत्वातील भारतीय संघाने या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवला. त्यानंतर गुवाहाटी येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून पुनरागमन केले. रायपूर येथे होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असून, यातून मालिकेची दिशा ठरली.

रायपूर येथे होणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी20 सामना असेल. येथील खेळपट्टी प्रामुख्याने फलंदाजांना मदत करणारी असल्याने या सामन्यात देखील 200 पेक्षा जास्त धावा पाहायला मिळतील. तसेच दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला दवाचा फायदा देखील होऊ शकतो.

या सामन्यासाठी दोन्ही संघात बदल होणे निश्चित आहे. या सामन्यात उपकर्णधार म्हणून भारतीय संघात सामील झालेला श्रेयस अय्यर दिसेल. तर आपल्या लग्नामुळे तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसलेला वेगवान गोलंदाज मुकेश कुमार पुनरागमन करेल. तसेच ऑस्ट्रेलिया संघाचे सहा अनुभवी खेळाडू माहिती परतल्याने अनेक युवा खेळाडू अंतिम अकरामध्ये दिसणार आहेत.

उभय संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन:

ऑस्ट्रेलिया- ट्रॅव्हिस हेड, आरोन हार्डी, जोश फिलिप, मॅथ्यू शॉर्ट, बेन मॅकडरमॉट, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड(कर्णधार), नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन

भारत- यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

(Preview India V Australia 4 Th T20I At Raipur Shreyas Iyer Comeback)

महत्वाच्या बातम्या – 
‘आता परिणाम भोगा…’, 24 वर्षीय गिलच्या हाती कर्णधारपदाची सूत्रे देताच डिविलियर्सची गुजरातला चेतावणी
टी20 वर्ल्डकपसाठीचे 20 संघ फायनल! यांना मिळाले तिकिट, तर यांचा झाला हिरमोड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---