आंतरराष्ट्रीय क्रिकेट तीन प्रकारांमध्ये खेळले जाते. यात कसोटी क्रिकेट,वनडे क्रिकेट आणि टी२० क्रिकेटचा समावेश आहे. क्रिकेटच्या तीनही प्रकारात दोन प्रकारचे चेंडू वापरण्यात येत होते. आता यात आणखी एका चेंडूची भर पडली आहे. तुम्ही फलंदाजांना चेंडू मैदानाबाहेर मारताना नक्कीच पाहिलं असेल. तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या चेंडूची खरी किंमत किती असते. चला तर मग जाणून घेऊया.
कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसाला ९० षटक गोलंदाजी केली जाते. तसेच कसोटी क्रिकेट हे साधारणत: दिवसा खेळले जाते, त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये लाल रंगाच्या चेंडूचा वापर केला जातो. लाल रंगाच्या चेंडूची किंमत ८००० रुपये इतकी असते. तसेच एसजी कंपनीचा चेंडू हा ५००० रुपयांचा असतो. गेल्या काही वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये नवीन आविष्कार करण्यात आला आहे.
आता कसोटी क्रिकेटमध्ये दिवस-रात्र सामने देखील खेळवले जातात. संध्याकाळ व्हायला लागली की लाल रंगाचा चेंडू उमटून दिसत नाही. त्यामुळे गुलाबी रंगाच्या चेंडूने हा सामना खेळला जातो. या चेंडूची किंमत देखील लाल रंगाच्या चेंडू इतकीच असते.
तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पांढऱ्या रंगाचा चेंडू वापरला जातो. त्यामुळे या चेडूंना जास्त चकाकी असते. तसेच २० षटकं आणि ५० षटकं खेळल्या जाणाऱ्या चेंडूची किंमत जास्त असते. कुकाबुराचा पांढऱ्या चेंडूची किंमत १२,००० रुपये इतकी असते. तसेच एसजी कंपनीच्या चेंडूची किंमत ४००० रुपये इतकी असते.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन, गांगुली आणि द्रविडने २४ वर्षांपूर्वी तोडले होते कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे मन
आयपीएलमध्ये ज्या संघाकडून खेळले, त्याच संघाचे महागुरू झालेले ५ दिग्गज
एमएस धोनी ते रिषभ पंत! जाणून घ्या यंदाच्या आयपीएल मधील आठही संघांचे कर्णधार