भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा सध्या इंग्लंडमध्ये वनडे कप स्पर्धा खेळत आहे. नॉर्दम्पटनशायर संघासाठी खेळत असताना त्याने रविवारी (13 पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला. स्पर्धेत आपला पाचवा सामना खेळत असलेल्या पृथ्वी याने डरहॅमविरुद्ध 68 चेंडूंवर तुफानी शतक झळकावले. त्याने या आधीच्या सामन्यात त्याने सॉमरसेटविरूद्ध 244 धावांची शानदार खेळी केली होती.
पृथ्वी सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. त्यामुळे त्याने या वनडे कपसाठी नॉर्दम्पटनशायर संघासोबत करार केला आहे. पहिल्या दोन सामन्यात फारशी चमकदार कामगिरी त्याला जमली नाही. मात्र, तिसऱ्या सामन्यात सॉमरसेट विरुद्ध त्याने आपल्या लिस्ट ए कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकावले होते. आपला तोच फॉर्म कायम ठेवताना त्याने रविवारी देखील आक्रमक फटकेबाजी केली.
डरहॅम संघाला नॉर्दम्पटनशायर संघाच्या गोलंदाजांसमोर मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. ते केवळ 198 पर्यंत मजल मारू शकले. विजयासाठी मिळालेल्या 199 धावांचा पाठलाग करताना पृथ्वी याने आक्रमक रूप धारण केले. त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पडत केवळ 68 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहताना 76 चेंडूत 125 धावांची खेळी केली. यामध्ये 15 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे नॉर्दम्पटनशायर संघ सहा गडी राखून विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.
यावर्षी आयपीएलमध्ये अपयशी ठरल्यानंतर पृथ्वी याचे भारतीय संघातील पुनरागमनाचे दार काहीसे बंद झाले होते. त्याने भारतीय संघासाठी आपला अखेरचा सामना 2021 मध्ये खेळला आहे. त्याचा हाच फॉर्म कायम राहिल्यास तो पुन्हा एकदा भारतीय संघासाठी खेळू शकतो.
(Prithvi Shaw Again Hits Century For Northamptonshire In ODI Cup)
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकासाठी वनडे निवृत्तीतून माघार घेणार बेन स्टोक्स? लवकरच होणार संघाची घोषणा
वाद मिटला! स्वतः विराट म्हणाला, ‘बाबर जगात एक नंबर फलंदाज’, पहिल्या भेटीविषयी केला खुलासा