भारतीय संघ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या व तीन वनडे सामन्यांच्या मालिकंसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा व हार्दिक पांड्या अनुक्रमे वनडे व टी20 मालिकांमध्ये भारताचे नेतृत्व करताना दिसतील. या मालिकांसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र, या मालिकांसाठी पुन्हा एकदा मुंबईचा आक्रमक सलामीवीर पृथ्वी शॉ याच्याकडे दुर्लक्ष केले गेले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत असूनही, पृथ्वी याला संघात स्थान का मिळत नाही? याबाबत अनेकदा बोलले जाते.
पृथ्वी याने 2018 मध्ये त्याच्याच नेतृत्वात भारतीय अंडर 19 संघाला विश्वचषक जिंकून दिला होता. त्यावर्षीच त्याला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच शतक साजरे केले. दुसऱ्या सामन्यातही तो चांगली फलंदाजी करताना दिसला. त्यानंतर मात्र त्याची बॅट थंडावली. ऑस्ट्रेलियातील 2020 ऍडलेड कसोटीनंतर त्याला पुन्हा कसोटी संघात स्थान मिळाले नाही. त्याची कसोटी कारकीर्द सध्या केवळ 5 सामन्यांची आहे. वनडे क्रिकेटमध्येही तो केवळ सहा सामने खेळू शकला आहे. तर, टी20 क्रिकेटमध्येही त्याच्या नावे एकच सामना लागलेला दिसतो. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2021 मध्ये खेळला आहे.
यावर्षी आयपीएलमध्ये 10 सामन्यात 152.87 च्या सरासरीने 283 धावा केल्या होत्या. तसेच सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत तो तुफान फॉर्ममध्ये दिसतोय. 10 सामन्यात 36.88 च्या सरासरीने व 181.27 च्या शानदार सरासरीने 332 धावा केल्या आहेत. तसेच विजेतेपद पटकावलेल्या मुंबई संघाचे नेतृत्वही त्यानेच केले होते. तसेच विजय हजारे ट्रॉफी व सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी त्याची कामगिरी चांगली होतेय.
(Prithvi Shaw Again Ignored By Selection Committee)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी! बांगलादेशच्या हेड कोचने दिला राजीनामा
भारताचे कसोटी स्टार आयसीसी क्रमवारीत चमकले, अय्यरने घेतली 10 स्थानांची झेप






