भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 5 ऑगस्टपासून लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळला जाईल. तिसऱ्या कसोटीपूर्वी पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव हे संभाव्य अकरा खेळाडूंमध्ये निवडीसाठी उपलब्ध असतील. दोघांनाही दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने मोठा विजय मिळवल्यानंतर या दोघांना संघात खेळण्याची संधी दिली जाईल की नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
भारतीय संघात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे काही काळासाठी खराब फॉर्ममध्ये होते. पण लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात दोघांनीही फॉर्ममध्ये परतत चांगली खेळी खेळली आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अशा परिस्थितीत, आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, संघ व्यवस्थापन या दोघांना वगळण्याचा विचार करेल की नाही?
इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वी शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या दुखापतीमुळे पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव, या दोघांचा संघात बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. या कारणास्तव, श्रीलंकेत एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत सहभागी झालेल्या दोन्ही फलंदाजांना मालिका संपवून थेट इंग्लंडला बोलावण्यात आले.
पृथ्वी शॉला शुभमनच्या जागी सलामीवीर म्हणून प्रबळ दावेदार मानला जात होता. पण सलामीवीर केएल राहुलने पहिल्या दोन कसोटींमध्ये ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, ते पाहता शॉचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होणे कठीण दिसत आहे. अशा स्थितीत शॉला उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी धूसर आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जर रोहित आणि राहुल या सलामीच्या जोडीपैकी कुणी जखमी झाला तरच शॉला प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
सूर्यकुमार यादवने त्याच्या चमकदार फलंदाजीने भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात आपले स्थान जवळजवळ पक्के केले आहे. परंतु त्याला अद्याप कसोटीत संधी मिळालेली नाही. भारतीय संघाच्या मधल्या फळीतील पुजारा आणि रहाणेच्या खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादवसाठी प्लेइंग इलेव्हनचा मार्ग शॉसारखा कठीण नसेल. पण लॉर्ड्स कसोटीत या अनुभवी जोडीने खेळलेल्या महत्त्वपूर्ण खेळीनंतर, संघ व्यवस्थापन दोघांबाबत काय निर्णय घेतो? हे पाहणे महत्त्वाचे असेल.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील येता तिसरा कसोटी सामना बुधवारपासून (25 ऑगस्ट) सुरू होणार आहे. हा सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तिसऱ्या कसोटीत ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ पुजाराचा कटणार पत्ता? उपकर्णधार रहाणेने दिले ‘हे’ संकेत
व्वा व्वा! विरोधी संघाच्या दिग्गजाकडूनच भारताला गुरुमंत्र; ‘अशी’ जिंकता येईल हेडिंग्ले कसोटी
हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडकडून ‘हे’ २ नवीन खेळाडू मैदानात उतरणार, कर्णधार रूटने दिले संकेत