भारतातील प्रसिद्ध देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफी २०२१ चा आज (१४ मार्च) अंतिम सामना रंगला आहे. अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे उत्तर प्रदेश विरुद्ध मुंबई यांच्यात हा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा कर्णधार आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला गंभीर दुखापत झाली आहे.
प्रतिस्पर्धी उत्तर प्रदेश संघाची फलंदाजी चालू असताना फिरकीपटू प्रशांत सोलंकी डावातील २४ वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील एका चेंडूवर फलंदाज माधव कौशिकने स्लिपच्या दिशेने जोरदार फटका मारला. त्याने मारलेला चेंडू स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या शॉच्या पायाला लागला आणि तो मैदानावर कोसळला. त्यानंतर त्याला फार वेदना होऊ लागल्याने उचलून त्याला मैदानाबाहेर न्यावे लागले.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1370971412450533380?s=20
Not good signs for Mumbai in the Vijay Hazare Trophy Finals. Prithvi Shaw has left the field. pic.twitter.com/2MmaKGim0g
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 14, 2021






