रविवारी (2 ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर, उपकर्णधारपदी श्रेयस अय्यरची वर्णी लागलीये. भारतीय संघाकडून प्रथमच बोलावणे आलेल्या रजत पाटीदार आणि मुकेश कुमारसह 16 खेळाडूंच्या या संघात शाहबाज अहमद आणि राहुल त्रिपाठी या आयपीएल गाजवलेल्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र, या संपूर्ण यादीत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉ याचे नाव नाही. भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच पृथ्वी शॉने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, जी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
Prithvi Shaw's Instagram story. pic.twitter.com/t31ZUIcvdR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 2, 2022
पृथ्वी शॉने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, ‘त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका, त्याच्या कृतीवर विश्वास ठेवा. कारण कृती हे सिद्ध करेल की शब्द अर्थहीन का आहेत..’
अनेक जण या पोस्टचा अर्थ सरळ भारतीय संघाच्या निवडीबाबत लावत आहेत. शॉने भारतासाठी आपला शेवटचा सामना जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.
पृथ्वी शॉ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, नुकत्याच न्यूझीलंड अ विरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत वनडे सामन्यात, त्याने 77 धावांची शानदार खेळी खेळली होती. तर दुलीप ट्रॉफी 2022 च्या उपांत्य फेरीत त्याने पहिल्या डावात 60 तर दुसऱ्या डावात 140 धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार , आवेश खान , मोहम्मद सिराज, दीपक चहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिक्षाचालकचा मुलगा काढणार दक्षिण आफ्रिकी संघाचा घाम! भारतीय संघात पहिल्यांदाच मिळालीये संधी
INDvSA: ‘सूर्याच खरा गेमचेंजर’, मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या राहुलचे आश्चर्यकारक विधान
टेन्शन वाढलं! हर्षल-अक्षर आणि अर्शदीपला मिळून चोपल्या गेल्या 160 धावा