भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ या फेब्रुवारी महिन्यात एका गंभीर प्रकरणात सामील झाला होता. महिला मॉडेल सपना गिल हिने त्याच्यावर मारहाण व गैरवर्तणुकीचा आरोप केलेला. आता जवळपास चार महिन्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला असून, यामध्ये पृथ्वीला क्लीन चिट देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर व दिलेल्या जबाबानंतर कोर्टाने हा निर्णय दिला.
एका पबमध्ये झालेल्या वादानंतर मुंबईच्या रस्त्यांवर या दोन्ही पक्षांमध्ये मोठी भांडणे झाली होती. यामध्ये पृथ्वीच्या मित्राच्या गाडीवर सपना गिल व तिच्या मित्रांनी हल्ला केलेला. त्यावर पृथ्वीने पोलिसात तक्रार दाखल केलेली. तसेच सपना हिनेदेखील दुसऱ्या बाजूने आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप पृथ्वीवर केलेला. तसेच त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला. मात्र त्याला अटकपूर्व जामीन मिळालेला. त्यानंतर कोर्टाने सपना व तिच्या मित्रांना न्यायालयीन कोठडीची सजा सुनावलेली. जामीन मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी अधिक तपास करत कोर्टाला अहवाल सादर केला.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या अहवालामध्ये, पृथ्वी व त्याचे मित्र निर्दोष असून, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे म्हटलेल. पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण ज्या ठिकाणी घडले तेथील सीसीटीव्ही फुटेज तसेच त्या ठिकाणी हजर असलेल्या एका निमलष्करी दलाच्या जवानाच्या जबाबदावरून हा अहवाल दिला होता. त्या जवानाच्या जबाबात सांगितले होते की, सपना ही पृथ्वीशी चुकीचे वर्तन करत होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पृथ्वी शॉ याची 15 फेब्रुवारी रात्री विलेपार्ले येथील एका नाईट क्लबमध्ये काही लोकांशी बाचाबाची झाली होती. पृथ्वी शॉ याच्याशी हे लोक सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पृथ्वीने नकार दिल्यानंतर या आठ जणांनी मिळून त्याच्या मित्राच्या गाडीवर बेसबॉल बॅटने हल्ला केला. त्यानंतर ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये शॉ व त्याच्या मित्राने तक्रार दाखल केली होती.
(Prithvi Shaw Have Clean Cheat In Sapna Gill Controversy From Mumbai High Court)
महत्वाच्या बातम्या –
MPL 2023: पुणेरी बाप्पा की ईगल नाशिक टायटन्स? कोण ठरणार क्वालिफायर 2 साठी पात्र?
क्रिकेटच्या महाकुंभाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात; बघा टीम इंडियाचे वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक, कधी आणि कुणाशी भिडणार