---Advertisement---

BIG BREAKING: इंग्लंडमध्ये पृथ्वीचा धमाका, वनडे कपमध्ये झळकावले वादळी द्विशतक

On: बुधवार, ऑगस्ट 9, 2023 6:50 PM
---Advertisement---

सध्या इंग्लंडमध्ये रॉयल लंडन वनडे कप ही महत्त्वाची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. नॉर्दम्पटनशायर काऊंटी संघासाठी खेळत असलेला भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने सॉमरसेट संघाविरुद्ध खेळताना शानदार फटकेबाजी करत द्विशतक साजरे केले. 129 चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे शंभर ते 200 हा टप्पा पार करण्यासाठी त्याने केवळ 48 चेंडूंचा सामना केला.

हंगामातील केवळ तिसरा सामना खेळत असलेल्या पृथ्वीने या सामन्यात सलामीला फलंदाजी केली. पहिल्या दोन सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करू न शकलेल्या पृथ्वीने या सामन्यात मात्र सुरुवातीपासून आक्रमण केले. त्याने अवघ्या 81 चेंडूंमध्ये इंग्लंडमधील आपले पहिले शतक झळकावले. त्यानंतर त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ आणखी वाढला. त्याने 129 चेंडूंमध्ये आपल्या कारकिर्दीतील दुसरे लिस्ट ए द्विशतक पूर्ण केले.

यापूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने मुंबई संघासाठी ही कामगिरी केली होती. अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याने 153 चेंडूवर 244 धावा कुटल्या. यामध्ये 29 चौकार व अकरा षटकारांचा समावेश होता. त्याच्या याच फलंदाजीमुळे संघाने 8 बाद 415 धावांचा टप्पा पार केला.

बातमी अपडेट होत आहे

(Prithvi Shaw Hits 200 In Royal London Cup For Northamptonshire)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---