काही दिवसांपूर्वी झालेले क्रिकेटपटू पृथ्वी शॉ व मॉडेल सपना गिल यांच्यातील भांडणाचे प्रकरण आता चांगले चिघळले आहे. चार दिवसांच्या पोलीस कोठडीतून जामिनावर बाहेर आल्यानंतर सपना गिल हिने पृथ्वी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विविध दहा कलमांतर्गत तिने ही तक्रार दाखल केली. यामध्ये विनयभंग तसेच जिवितास धोका निर्माण करणे अशा गंभीर गुन्हे दाखल आहेत.
बुधवारी (15 फेब्रुवारी) सदरची घटना मुंबई येथील एका क्लबमध्ये झालेली. क्लब मधील वादानंतर सपना व तिच्या मित्रांनी पृथ्वीच्या मित्राच्या गाडीवर बेसबॉल बॅटने हल्ला केलेला. त्यानंतर पृथ्वी व सपना यांच्यातील वादाचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला. पृथ्वीने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सपना राठी व तिच्या मित्रांना 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले.
सोमवारी जामिनावर बाहेर आल्यानंतर सपना हिनेही पोलिसांमध्ये पृथ्वी याच्या विरोधात तक्रार दाखल केली. भारतीय दंड संहितेच्या कलम 34, 120A, 144, 146, 148, 149, 323, 324, 351, 354 आणि 509 अंतर्गत ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. यामध्ये विनयभंग तसेच जिवितास धोका निर्माण करणे यासारख्या गंभीर कलमांचा सहभाग आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पृथ्वी शॉ याची बुधवारी रात्री विलेपार्ले येथील एका नाईट क्लबमध्ये काही लोकांशी बाचाबाची झाली होती. पृथ्वी शॉ याच्याशी हे लोक सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पृथ्वीने नकार दिल्यानंतर या आठ जणांनी मिळून त्याच्या मित्राच्या गाडीवर बेसबॉल बॅटने हल्ला केला. त्यानंतर ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये शॉ व त्याच्या मित्राने तक्रार दाखल केली होती.
(Prithvi Shaw Hustle Sapana Gill File Complaint Against Cricketer Prithvi Shaw Charges Of Miss Behaviour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत दौरा मध्येच सोडून जाणारा ऑस्ट्रेलियन पठ्ठ्या पहिल्यांदाच बनला ‘बापमाणूस’, बाळाचं नावही केलं जाहीर
भारतीय संघाच्या जर्सीवर झळकणार ‘या’ आघाडीच्या ब्रँडचा लोगो! करार पक्का करण्यासाठी बीसीसीआय सज्ज