Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय संघाच्या जर्सीवर झळकणार ‘या’ आघाडीच्या ब्रँडचा लोगो! करार पक्का करण्यासाठी बीसीसीआय सज्ज

भारतीय संघाच्या जर्सीवर झळकणार 'या' आघाडीच्या ब्रँडचा लोगो! करार पक्का करण्यासाठी बीसीसीआय सज्ज

February 21, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Team-India

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघाच्या जर्सीवर आपल्याला वेगवेगळ्या ब्रँड्सचे स्टिकर किंवा लोगो दिसतात. यासाठी कंपनीचा बीसीसीआयसोबत करार असतो. आता भारतीय संघाच्या जर्सीवर नवीन ब्रँडचा लोगो दिसणार असल्याचे वृत्त आहे. क्रीडा वस्तू बनवणारी आघाडीची एडिडास कंपनी आता भारतीय क्रिकेट संघाची किट स्पॉन्सर बनण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या भारताच्या किट स्पॉन्सरचे हक्क किलर जीन्स कंपनीकडे होते.

माध्यमातील वृत्तांनुसार, एडिडास (Adidas) कंपनीचा करार यावर्षी जूनमध्ये सुरू होईल आणि मार्च 2028पर्यंत असेल. जेव्हापासून किलर हा किट स्पॉन्सर बनला आहे, तेव्हापासून याकडे क्रिकेटची पार्श्वभूमी नसलेली कंपनी म्हणून पाहिजे जात होते. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) हे सर्व व्यवस्थित करण्यासाठी उत्सुक होते, आणि ते आता किट स्पॉन्सर बदलण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही बातमी न्यूज 18ने दिली आहे.

बीसीसीआयचा मागील किट स्पॉन्सर, मोबाईल प्रीमिअर लीग (एमपीएल) हे करारातून लवकरच बाहेर पडला. तसेच, किलर जीन्स त्याजागी आला. एमपीएलपूर्वी नाईके (Nike) कंपनीचा बीसीसीआयसोबत 5 वर्षांचा करार होता. यादरम्यान त्यांनी बीसीसीआयला 2016 ते 2020पर्यंत 370 कोटी रुपये दिले होते.

एडिडास वाढवणार ब्रँड व्हॅल्यू
बीसीसीआय आणि नाईकेचा करार संपल्यानंतर एमपीएल आणि त्याच्यानंतर किलर कंपनी स्पॉन्सर बनली होती. एमपीएल आणि किलर स्पॉन्सर बनल्यानंतर असा प्रश्न उपस्थित होऊ लागलेला की, या कंपन्यांना खेळाची पार्श्वभूमी नाहीये. अशात आता एडिडासच्या येण्याने संघाच्या किटला पुन्हा एकदा मजबूत ओळख असलेला किट स्पॉन्सर मिळेल आणि जगभरातील ब्रँड व्हॅल्यूमध्येही वाढ होईल.

यापूर्वी एडिडास मुंबई इंडियन्स आणि इंग्लंड क्रिकेट संघाचा किट स्पॉन्सर होता. सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि रिषभ पंत हेदेखील ए़डिडास कंपनीचे ब्रँड एम्बेसेडर आहेत. मात्र, भारतीय क्रिकेट संघाच्या माध्यमातून एडिडास राष्ट्रीय क्रिकेट संघात प्रवेश करेल. सध्या एडिडासचा इंग्लंडसोबतचा करार संपल्यानंतर फक्त नॉटिंघमशायर, साऊथ ईस्ट स्टार्स आणि सरे संघांचा स्पॉन्सर आहे. (india cricket jersey sponsor adidas will be the new kit sponsor of indian cricket team know here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के! ‘हा’ विस्फोटक खेळाडू आख्ख्या मालिकेतूनच पडला बाहेर
Video: सामना गमावला, पण आयर्लंड महिलांनी फिल्डिंगने जिंकली मने; हरमन 13, तर ऋचा शून्यावर बाद


Next Post
Press

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत खेळाडू होणार मालामाल, बक्षीस रक्कम झोप उडवणारी

Mitchell-Swepson

भारत दौरा मध्येच सोडून जाणारा ऑस्ट्रेलियन पठ्ठ्या पहिल्यांदाच बनला 'बापमाणूस', बाळाचं नावही केलं जाहीर

Virat-Kohli

ही तर हाईटच झाली! चाहतीने विराटला सर्वांसमोर केले किस? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143