Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के! ‘हा’ विस्फोटक खेळाडू आख्ख्या मालिकेतूनच पडला बाहेर

ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के! 'हा' विस्फोटक खेळाडू आख्ख्या मालिकेतूनच पडला बाहेर

February 21, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Cricket-Australia

Photo Courtesy: bcci.tv


नुकतेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला. अशात आता बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतून मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीने ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के दिले आहेत. पाहुण्या संघाचा विस्फोटक खेळाडू डेविड वॉर्नर पुढील दोन्ही कसोटी सामन्यातून संघाबाहेर पडला आहे. असे म्हटले जात आहे की, तो दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. वॉर्नरला दिल्ली कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही तो फलंदाजी करण्यासाठी उतरला नव्हता.

ऑस्ट्रेलियाला परतणार
असे म्हटले जात आहे की, डेविड वॉर्नर (David Warner) हा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. सध्या तो त्याच्या कुटुंबासोबत भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट देत आहे. त्यादरम्यानचे फोटोही त्याने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, तो दुखापतीमुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघाचा भाग नसेल. अद्याप क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरच्या बदली खेळाडूबद्दल कोणतीही माहिती आली नाहीये.

दिल्ली कसोटीत झालेला दुखापतग्रस्त
खरं तर, दिल्ली कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना डेविड वॉर्नर याला मोहम्मद सिराज याच्या उसळी चेंडूवर कोपराला दुखापत झाली होती. तसेच, एक उसळी चेंडू थेट त्याच्या हेल्मेटला जाऊ लागला होता. त्यामुले त्याला मैदानावर फिजिओंना बोलवावे लागले होते. दुखापतीनंतर वॉर्नर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठीदेखील येऊ शकला नव्हता. अशात आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवदेन जारी करत म्हटले आहे की, “वॉर्नरला दिल्ली कसोटीत कोपराची दुखापत झाली होती. त्यामुळे वॉर्नर मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांसाठी संघाचा भाग नसेल.”

Another blow for the Aussies with David Warner heading home.@ARamseyCricket | #INDvAUS

— cricket.com.au (@cricketcomau) February 21, 2023

असे म्हटले जात आहे की, वॉर्नरच्या अनुपस्थितीत उस्मान ख्वाजा याच्यासोबत ट्रेविस हेड डावाची सुरुवात करेल किंवा संघातील इतर खेळाडूला ही जबाबदारी मिळू शकते. कारण, दिल्ली कसोटीदरम्यानही जेव्हा वॉर्नर सलामीला उतरला नव्हता, तेव्हा ख्वाजासोबत हेडने डावाची सुरुवात केली होती. अशात त्याला ही जबाबदारी पुढील दोन्ही सामन्यात मिळू शकते. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-0ने आघाडीवर आहे. (cricketer David Warner has been ruled out of the final two BGT Tests due to his elbow fracture)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: सामना गमावला, पण आयर्लंड महिलांनी फिल्डिंगने जिंकली मने; हरमन 13, तर ऋचा शून्यावर बाद
‘मी त्याला प्रशिक्षण देत नाही…’, राहुलच्या फ्लॉप कामगिरीवर कोच द्रविडची सर्वात मोठी प्रतिक्रिया


Next Post
Team-India

भारतीय संघाच्या जर्सीवर झळकणार 'या' आघाडीच्या ब्रँडचा लोगो! करार पक्का करण्यासाठी बीसीसीआय सज्ज

Press

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत खेळाडू होणार मालामाल, बक्षीस रक्कम झोप उडवणारी

Mitchell-Swepson

भारत दौरा मध्येच सोडून जाणारा ऑस्ट्रेलियन पठ्ठ्या पहिल्यांदाच बनला 'बापमाणूस', बाळाचं नावही केलं जाहीर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143