मुंबई| काल झालेल्या अध्यक्षीय संघ विरुद्ध न्यूजीलँड सराव सामन्यात प्रतिभावान युवा खेळाडू पृथ्वी शॉने अर्धशतकी खेळी केली होती. इतक्या कमी वयात प्रतिभावान कामगिरी सध्या पृथ्वी करत आहे. तो सध्या फक्त १७ वर्ष ३४३ दिवसांचा आहे.
त्याच्या या कामगीनंतर न्यूजीलँडचा वेगवान गोलंदाज ट्रेंड बोल्टने त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. तो पृथ्वीबद्दल म्हणाला की “मी ऐकलं आहे तो फक्त १७ वर्षांचा आहे. तो खूप चांगला खेळला. सुरवातीला बॉल चांगला वळत होता पण असं वाटत होत की त्याच्यावर याचा काहीही परिणाम होत नाही. तो अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांच्यासमोर सगळं नीट झालं तर उत्तम कारकीर्द आहे. त्याच्या पहिल्याच भेटीत त्याने प्रभावित केले आहे.”
पृथ्वी शॉने आत्तापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३ सामन्यात २ शतके तसेच १ अर्धशतक केले आहे.
त्याचबरोबर बोल्ट कालच्या सामन्याविषयीही बोलला “दुपारी इथे फार गर्मी होती. पराभवामुळे निराशा झाली. गोलंदाजीत विविध योजना राबण्याची उत्तम संधी मिळाली. इथे येऊन योग्य लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी बरोबरच फलंदाजांना बाद करणेही महत्वाचे आहे. ते चांगले खेळले.”
त्याचबरोबर तो म्हणाला ” विरुद्ध संघाच्या सलामीवीरांनी चांगली कामगिरी केल्यामुळे बाकीच्या फलंदाजांना चांगले व्यासपीठ मिळाले” तसेच सामन्याच्या सुरवातीला २-३ बळी घेणे महत्वाचे असेल आणि योग्य गुणवत्ता असलेल्या संघाविरुद्ध खेळताना चूक करण्याचा वाव नसतो, असेही तो सांगत होता.
तो त्याच्या गोलंदाजी बद्दल म्हणाला की तो सामन्याच्या सुरवातीला बॉल स्विंग करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. तसेच यॉर्कर आणि डॉट बॉल टाकण्याचाही त्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर तो म्हणाला की इथे आयपीएलचा अनुभव उपयोगी येईल.