fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सर्वात कमी वयात कसोटी सामन्यातील पहिला चेंडू खेळणारे ४ खेळाडू

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून या सामन्यात १८ वर्ष ३२९ दिवस वय असलेल्या पृथ्वी शाॅने कसोटी पदार्पण केले. 

तसेच प्रथेप्रमाणे पदार्पणाच्या सामन्यात जर खेळाडू सलामीवीर असेल तर सिनीयर खेळाडू पहिला चेंडू खेळतो. परंतु या सामन्यात पृथ्वीनेच पहिला चेंडू खेळला.

यामुळे त्याच्या नावावर एक खास विक्रम जमा झाला. सर्वात कमी वयात कसोटी सामन्यातील पहिला चेंडू खेळणारा तो चौथा तरुण खेळाडू ठरला आहे.

त्याने १८ वर्ष आणि ३२९ दिवसांचा असताना हा कारनामा केला आहे. पृथ्वीपेक्षा कमी वयाचे असताना हॅमिल्टन मसकाझा, तमीम इक्बाल आणि इम्रान फरहातने कसोटी सामन्यातील पहिला चेंडू खेळला आहे.

भारताकडून कसोटीत सलामीला फलंदाजीला येणारा तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यापुर्वी विजय मेहरा यांनी १७ वर्ष आणि २५७ दिवसांचे असताना सलामीला फलंदाजी केली होती परंतु त्या सामन्यातील पहिला चेंडू विनु मंकड खेळले होते.

महत्वाच्या बातम्या-

You might also like