हैद्राबाद | दिल्ली डेअरडेविल्सचा सलामीवीर पृथ्वी शाॅने आपला गोल्डन फाॅर्म आजही कायम राखला आहे. आज त्याने हैद्राबादविरुद्ध खेळताना ३६ चेंडूत ६५ धावा करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली.
त्याने संघाला चांगली सुरुवात करुन देताना ३ षटकार आणि ६ चौकारांची बरसात केली. तो जेव्हा बाद झाला तेव्हा दिल्ली डेअरडेविल्सला १० षटाकांत २ बाद ९५ धावांची जबरदस्त सुरूवात मिळाली.
त्याचे हे आयपीएल २०१८मधील दुसरे अर्धशतक आहे. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात दोन अर्धशतके करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
आयपीएलमध्ये ५ सामन्यात त्याने ४१ च्या सरासरीने २०५ धावा केल्या आहेत. त्यात त्याने २३ चौकार आणि ९ षटकार मारले आहेत.
Youngest to score a fifty in IPL
18y 169d Prithvi Shaw (2018)
18y 169d S Samson (2013)
18y 171d Prithvi Shaw (2018) (Today)
18y 212d R Pant (2016)
18y 237d SHUBHMAN GILL (2018) *
18y 299d I Kishan (2017) #IPL #IPL18— Sharad Bodage (@SharadBodage) May 5, 2018