भारतीय संघाकडून विंडीज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणारा मुंबईचा फलंदाज पृथ्वी शॉला सध्या सुरू असलेल्या देवधर ट्रॉफीमधून विश्रांती देण्यात आली आहे.
या स्पर्धेत इंडीया ए कडून खेळणाऱ्या शॉला दिपक चहरच्या गोलंदाजीवर हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली. तसेच त्याचा उजवा खांदाही दुखत असल्याने त्याला आराम दिला आहे.
हैद्राबादमध्ये झालेल्या विंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यात शॉला कोपऱ्याचा त्रास पहिल्यांदा जाणवला होता. तर विजय हजारे ट्रॉफीच्या दरम्यान तो त्रास आणखीनच वाढला.
शॉच्या एमआरआय स्कॅनमध्ये त्याच्या कोपऱ्याला गंभीर दुखापत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तो मुंबईला परतला असून त्याच्याजागी संघात केदार जाधवला घेण्यात आले आहे.
सध्या शॉला आराम करण्यास सांगितले असून त्याच्या खांद्याच्या दुखापतीबद्दल पुढील कोणतेच वृत्त आलेले नाही. तो लवकरात लवकर बरा होऊन संघात परतावा असे मुंबईची इच्छा आहे.
3 नोव्हेंबरला मुंबईचा रणजी ट्रॉफीमधील पहिला सामना आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या ड्वेन ब्रावोबद्दल या 10 गोष्टी माहित आहेत का?
–आयसीसी उतरले ट्रोलिंगच्या मैदानात; टीम पाकिस्तानलाही नाही सोडले
–निवृत्तीच्या दिवशीच ड्वेन ब्रावो सापडला मोठ्या वादात
–भारताच्या या दिग्गजाने वतर्वले भविष्य; लवकरच विराट मोडणार सचिनचा हा विक्रम