पृथ्वी शॉ मागच्या काही सामन्यांमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. पण अशातच त्याच्याविषयी एक वाईट बातमी समोर येत आहे. शॉच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे सांगितले गेले आहे. अशात सध्या सुरू असलेल्या रॉयल लंडन कप स्पर्धेतून त्याला माघार घ्यावी लागत आहे. मागच्या दोन सामन्यांमध्ये जबरदस्त खेळी केल्यानंतर ही बातमी नॉर्थऍम्टनशायर संघासाठी देखील निराशाजनक आहे.
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) मागच्या काही वर्षांमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. याच कारणास्तव जुलै 2021 नंतर त्याला भारतासाठी एकही सामना खेळता आला नाही. भारताचा 23 वर्षीय सलामीवीर फलंदाज कारकिर्दीतील सरुवातीच्या सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता. आपल्या पहिला आंतरराष्ट्रीय सामना त्याने वेस्ट इंडीज कसोटी फॉरमॅटविरुद्ध खेलला होता. पहिल्याच डावात शॉ याने शतक ठोकत आपली गुणवत्ता सिद्ध केली. परंतु नंतर आपल्या सततच्या सुमार प्रदर्शनामुळे त्याने संघात स्थान गमावले. दरम्यानच्या काळात इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याचे प्रदर्शन काही खास दिसले नाही.
असे असले तरी, शॉ इंग्लंडमध्ये सुरू अशलेल्या रॉयल लंडन कप 2023 मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने हंगामातील पहिल्या चार सामन्यांमध्ये त्याने एकूण 409 धावा केल्या आहेत. यात समरसेटविरुद्ध शॉच्या बॅटमधून 244 धावांची वादळी खेळी पाहायला मिळाली होती. तसेच डरहमविरुद्धच्या सामन्यात त्याने 125* धावा कुटल्या होत्या. शॉने शतक आणि द्विशतक केलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये नॉर्थऍम्टनशायर संघ विजयी झाला आहे. अशात संघासाठीही शॉला झालेली दुखापत महागात पडू शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार शॉच्या गुडघ्याला झालेली दुखापत गंभीर आहे आणि तो यसंदर्भात तज्ञांचा सल्ला घेणार आहे.
दरम्यान, पृथ्वी शॉ याने भारतासाठी आतापर्यंत 5 कसोटी, 6 वनडे आणि 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अनुक्रमे 339, 189 आणि 0 धावा केल्या आहेत. (Prithvi Shaw ruled out of the Royal London One Day Cup due to a knee injury.)
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! बेन स्टोक्सने अखेर मागे घेतली वनडे निवृत्ती, न्यूझीलंडविरुद्ध करणार कमबॅक
दिग्गजाने काढली एमएस धोनीची आठवण, मालिका गमावल्यानंतर हार्दिकच्या मताशी असहमत