दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी परतलेला भारतीय क्रिकेटपटू पृश्वी शॉ याने आयपीएलपूर्वी फिट होणार आहे, असे म्हटले आहे.
“मी माझ्या फिटनेसवर सध्या लक्ष देत असून आयपीएल सुरू होण्याआधी मी फिट होईल”, असे शॉने इंडिया टिव्हीला सांगितले.
नोव्हेंबर 2018 मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या ऑस्ट्रेलिया इलेवन विरुद्धच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शॉला पायाच्या घोट्याची गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले होते.
“ही एक दुर्दैवी घटना होती. मला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळायचे होते. पण परिस्थितीच अशी झाली की मी काही करूच शकलो नाही. भारताने ही मालिका जिंकल्याचा खूप आनंद आहे”, असेही शॉ पुढे म्हणाला.
शॉच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत सलामीवीरांबद्दल अडचणी आल्या होत्या. त्याच्या अनुपस्थितीत मुरली विजय आणि केएल राहुल हे अपयशी ठरले होते.
2018ला शॉने विडींज विरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण करतानाच शतक केले होते. त्याने आत्तापर्यंत 2 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये 118च्या सरासरीने 237 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये शॉ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–Video: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…
–ऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का
–अजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व