गुरुवारी (२९ एप्रिल ) झालेल्या सामन्यात युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने अनुभवी ओएन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला ७ गडी राखून पराभूत केले. या सामन्यात पृथ्वी शॉने कोलकाता संघाच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले होते. या सामन्यात त्याने ८२ धावांची तुफानी खेळी केली होती. याच खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर त्याने शिवम मावीच्या षटकाबद्दल खुलासा केला आहे.
कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करत असताना, पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्या जोडीने तुफान फटकेबाजी केली होती. शिखर धवन ४६ धावा करत माघारी परतला तर पृथ्वी शॉने अवघ्या ४१ चेंडूत ८२ धावांची झुंजार खेळी केली होती. यात त्याने ११ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. मुख्य म्हणजे त्याने शिवम मावीच्या पहिल्याच षटकात २५ धावा चोपल्या होत्या. यात ६ चेंडूत ६ चौकार आणि एका वाइड बॉलचा समावेश होता.
शिवम मावीविरुद्ध फलंदाजी करताना केलेल्या रणनितीबद्दल केला खुलासा
आपल्या तुफानी खेळीच्या जोरावर पृथ्वी शॉने दिल्ली कॅपिटल्स संघाला सामना जिंकून दिल्यानंतर त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर तो म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगू तर, मी कसलाच विचार करत नव्हतो. फक्त योग्य चेंडूची वाट पाहत होतो. आम्ही (शिवम मावी सोबत) एकमेकांविरुद्ध गेल्या ४ ते ५ वर्षांपासून खेळत आहोत. त्यामुळे मला अंदाज होता की, तो कुठे गोलंदाजी करेल. मी आधीच तयार होतो. पहिले चार-पाच चेंडू फेकले गेले, ते अर्ध्या खेळपट्टीवर होते. मी शॉर्ट बॉलसाठी सज्ज होतो पण दुर्दैवाने तो तेथे गोलंदाजी करु शकला नाही. ”
वीरेंद्र सेहवाग बद्दल बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला..
भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग देखील डावाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारण्यासाठी प्रसिद्ध होता. तसेच पृथ्वी शॉने देखील कोलकाता संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चौकार मारून डावाची सुरुवात केली होती. सामना झाल्यानंतर तो सेहवागबद्दल म्हणाला की, “मी वीरू सरांना अजुनपर्यंत कधीच भेटलो नाहीय. मला त्यांच्यासोबत संवाद साधायची देखील संधी मिळाली नाहीये. जर मला संधी मिळाली तर मी भाग्यवान असेल. जसं की नेहमीपासूनच म्हणत आलो आहे की, माझे प्रेरणास्थान माझे वडील आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘जिथेही जातो तिथे आग लावतो,’ मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहितला वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा
ललितने अश्विनसारखी गोलंदाजी करत घेतली अविश्वसनीय विकेट, प्रशिक्षक पाहून झाले दंग; बघा व्हिडिओ