आयपीएल २०२२चा पंधरावा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झाला. दिल्ली संघासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. कारण त्यांनी यापूर्वीचा गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना गमावला होता. मात्र फलंदाजांच्या चांगल्या सुरुवातीनंतर गोलंदाजांच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे दिल्लीने ६ विकेट्स राखून तो सामना गमावला. या सामन्यात दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉ याने मात्र सर्वश्रेष्ठ खेळ दाखवला. त्याने संघाकडून कडकडीत अर्धशतक झळकावले. मात्र सामन्यादरम्यान त्याच्यासोबत छोटा अपघातही घडला.
दिल्लीच्या फलंदाजीदरम्यान लखनऊच्या वेगवान गोलंदाज एँड्र्यू टाय (Andrew Tye) याचा चेंडू शॉच्या प्रायव्हेट पार्टला (Ball Hit Private Part Of Prithvi Shaw) जाऊन लागला. ही घटना डावातील सहाव्या षटकादरम्यान घडली. टायचा चेंडू प्रायव्हेट पार्टला लागल्यानंतर शॉ मैदानावर वेदनेने व्हिव्हळताना दिसला. परंतु थोड्या वेळाने शॉ पुन्हा उभा झाला आणि त्याने लखनऊच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.
शॉ ३४ चेंडू खेळताना २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ६१ धावा करून बाद (Prithvi Shaw Half Century) झाला. कृष्णप्पा गौथमने डावातील आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शॉला यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातून झेलबाद केले.
AM I the only one who thinks they look like #PrithviShaw 🤣🤣🏏 pic.twitter.com/u06ivyjpEP
— Rogers (@CEORiShikumar4) April 8, 2022
क्विंटन डी कॉकच्या मॅरेथॉन खेळीपुढे पृथ्वी शॉची खेळी व्यर्थ
शॉने दिल्ली संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. मात्र क्विंटन डी कॉकने लखनऊ संघाचा विजयी शेवट करून देण्याचे काम केले. दिल्लीच्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डी कॉकने ८० धावांची मॅरेथॉन खेळी केली. त्याने ५२ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे लखनऊने १९.४ षटकामंध्येच सामना जिंकला.
लखनऊचा विजयरथ सुस्साट
लखनऊने आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात पराभवासह केली होती. गुजरात टायटन्सने त्यांना ५ विकेट्स राखून पराभूत केले होते. मात्र या पराभवानंतर लखनऊने जोरदार पुनरागमन केले. त्यांनी दुसऱ्या सामन्यात अनुभवी चेन्नई सुपर किंग्जला ६ विकेट्सने धूळ चारली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादला १२ धावांनी पराभूत करत दुसरा विजय नोंदवला व आता दिल्लीला चितपट करत विजयाची हॅट्रिक केली आहे. या पराक्रमासह लखनऊ संघ सध्या ६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.