नवी दिल्ली| विंडिजविरूद्ध पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शाॅवर सर्वच स्तरातून कौतूकाचा वर्षाव झाला आहे. विंडीजविरूद्धच्या कसोटी सामन्यात पृथ्वीने अतिशय आत्मविश्वासाने फलंदाजी केली.
पहिल्याच कसोटी सामन्यात शतक ठोकल्यानंतर पृथ्वी शाॅवरील अपेक्षांचे ओझे वाढले आहे. हैद्राबाद येथे 12 आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक करून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी पृथ्वीला आहे.
गांगुली आणि रोहित शर्माने आपल्या दोन कसोटीत सामन्यांत शतक करण्याची किमया केली होती. गांगुलीने पदार्पणात 1996 मध्ये लाॅर्ड्सवरील कसोटी सामन्यात 131 धावांची खेळी होती. त्यानंतर नॉटिंघम येथे खेळलेल्या कसोटीत 136 धावांची खेळी केली होती.
रोहितने 2013 मध्ये कोलकत्ता येथे झालेल्या कसोटीत 177 धावांची शानदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर मुंबईत झालेल्या कसोटीत त्याने नाबाद 111 धावांची खेळी केली होती.
भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दिन यांना आपल्या पदार्पणातील पहिल्या तिन्ही कसोटी शतक ठोकण्याची किमया केली आहे. 1984 मध्ये कोलकत्त्यात इंग्लडविरूद्ध खेळलेल्या त्यांच्या पहिल्या कसोटीत 110 धावा केल्या होत्या. त्यानंतर चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी अजहर यांनी 105 धावांची खेळी केली होती. कानपुरमध्ये झालेल्या कसोटीत तिसऱ्या कसोटीत त्यांनी 122 धावांची जबरदस्त खेळी केली होती.
पृथ्वीला अजहर यांचा विक्रम गाठण्यासाठी जरी वेळ असला तरी तो रोहित शर्मा आणि सौरव गांगुली यांच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो.
महत्वाच्या बातम्या-
- बाबारे! धोनीची स्टाईल काॅपी करु नकोस… दिग्गजाचा रिषभ पंतला सल्ला
- अशी कामगिरी करणारा काशिलिंग अडके होणार पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू
- मुंबई विद्यापीठाच्या आंतर-झोन कबड्डी स्पर्धेत महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या मुलाची बाजी