ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी मध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉ याच्यावर अनेक दिग्गजांनी टीका केली होती. त्यांनतर त्याला सुरू असलेल्या भारत विरूद्ध इंग्लंड मालिकेतही स्थान देण्यात आले नव्हते. अशातच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तो आपल्या आक्रमक फलंदाजीने टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शॉला देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या पुदुच्चेरी संघाविरुद्ध त्याने नवीन विक्रम केला आहे.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत गुरुवारी (२५ फेब्रुवारी) पुदुच्चेरी संघाविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात कर्णधार शॉ याने अवघ्या १५२ चेंडूमध्ये २२७ धावांची खेळी केली आहे. ५ षटकार आणि ३१ चौकारांसह त्याने ही धावसंख्या उभारली आहे. या खेळीसोबतच त्याच्या नावे लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम झाला आहे. याआधी हा विक्रम ग्रीम पोलॉक याच्या नावावर होता. ज्याने २२२ धावांची खेळी केली होती. त्यांनतर आता पृथ्वी शॉने पुदुच्चेरी संघाविरुद्ध २२७ धावा करत विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दुहेरी शतक झळकावणारा शॉ चौथा फलंदाज ठरला आहे. या आधी संजू सॅमसन याने नाबाद २१२, यशस्वी जयस्वाल याने २०३, कर्णवीर कौशल २०२ धावा केल्या होत्या.एवढेच नव्हे तर, त्याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही शतकही झळकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शतक हुकलं पण बनला नवा ‘सिक्सर किंग’, रोहित शर्मालाही सोडलं पिछाडीवर
मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान मोदींचं नाव; राहुल गांधी निशाणा साधत म्हणतात, ‘सत्य आपोआप समोर येते’
दु:खद! ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूला झाला पितृशोक, कॅन्सरमुळे वडीलांचे निधन