न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना क्विन्सलॅंड येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने अखेरच्या षटकात विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली. मात्र, त्याचवेळी या सामन्या दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे सर्वजण हैराण राहिले. चालू सामन्यात मैदानाच्या अत्यंत जवळून प्रायव्हेट प्लेन गेल्याने सर्वजण चकीत झाले.
https://www.instagram.com/p/CqwfxTrPbkY/?igshid=MTIyMzRjYmRlZg==
हा सामना सुरू असताना श्रीलंका प्रथम फलंदाजी करत होती. त्यावेळी मैदानाच्या वरून अगदी कमी अंतरावरून एक प्रायव्हेट प्लेन गेले. त्यामुळे काही क्षण चाहते हैराण झाले. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव सुरू असताना देखील अशाच प्रकारे विमानाने उड्डाण भरले. क्विन्सलॅंड येथील सर जॉन डेव्हिस मैदानाच्या अगदी जवळच विमानतळ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक प्रायव्हेट जेट उतरत असतात. त्यामुळे या मैदानावर हे नजारे अनेकदा पाहायला भेटतात.
The current equation as the planes land here at Sir John Davies Oval in Queenstown 📍
Follow play LIVE on
@sparknzsport
📺 or Rova 📻 | LIVE scoring https://t.co/5zUsDJ0gj0 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/vyngMtWgT3— BLACKCAPS (@BLACKCAPS) April 8, 2023
या सामन्याचा विचार केला गेल्यास यजमान न्यूझीलंड संघाने मालिकादेखील आपल्या नावे केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या श्रीलंका संघाने 182 धावा उभारल्या होत्या. सलामीवीर कुसल मेंडीस याने 48 चेंडूवर 73 धावांची खेळी केली. त्याला कुसल परेरा व पथुम निसंका यांनी विशेष योगदान देत साथ दिलेली. न्यूझीलंडसाठी बेन लिस्टरने 2 बळी मिळवले. त्यानंतर यजमान संघ संपूर्ण डावात अतिशय आत्मविश्वासाने धावांचा पाठलाग करताना दिसला. टीम सिफर्टने 48 चेंडूवर 88 धावांचा तडाखा देत संघाला अखेरच्या षटकात विजयी केले. या विजयासह न्यूझीलंडने मालिका 2-0 अशा फरकाने खिशात घातली.
(Private Plane Comes In Newzealand Srilanka T20I)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवख्या जयसवालचा गुवाहाटीत धमाका! पहिल्याच ओव्हरमध्ये केली ‘अशी’ कामगिरी, थेट गेल-वॉर्नरच्या यादीत नाव
विमानात ब्लॉग करायला निघालेल्या चाहरला धोनीने दिलं हाकलून? दोनदा झाली ‘हटाई’, पाहा व्हिडिओ