जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाणार आहे. अशात या सामन्यापूर्वीच आयसीसीने डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. ही रक्कम इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा आणि त्यातील खेळाडूंच्या मानधनाच्या रक्कमेपेक्षाही कमी आहे. ही तुलना करणे कदाचित योग्य ठरणार नाही. कारण, आयसीसी स्पर्धा आणि एखाद्या देशातील टी20 लीगची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. मात्र, आकडेवारीतील तफावत पाहता क्रिकेटप्रेमींमध्ये ही चर्चा होत आहे. तरीही, आयसीसी ट्रॉफी ही नेहमी सर्वोच्चच आहे, यात दुमत नाही.
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याची बक्षीस रक्कम
आयसीसीने शुक्रवारी (दि. 26 मे) प्रसिद्धीपत्रक जाहीर करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्याची बक्षीस रक्कम जाहीर केली. यामध्ये त्यांनी सांगितले की, विजेत्या संघाला 13.23 कोटी रुपये बक्षीस रक्कम म्हणून मिळेल, तर उपविजेत्या संघाला 6.61 कोटी रुपये बक्षीस रकमेच्या रूपात दिली जाईल.
Prize pot for the ICC World Test Championship 2021-23 cycle revealed ????
Details ????https://t.co/ZWN8jrF6LP
— ICC (@ICC) May 26, 2023
आयपीएलमधील बक्षीस रक्कम
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याची बक्षीस रक्कम ही आयपीएल स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेच्या पुढे अतिसामान्य आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या विजेत्या संघाची बक्षीस रक्कम 20 कोटी आहे, तर उपविजेत्या संघाची बक्षीस रक्कम ही 13 कोटी आहे. तसेच, आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू पंजाब किंग्स संघाचा सॅम करन आहे. करनला पंजाबने आयपीएल 2023च्या लिलावात तब्बल 18.50 कोटी रुपयांना ताफ्यात सामील केले होते. त्यामुळे बक्षीस रकमेतील तफावत खूपच मोठी असल्याचे दिसते.
अंतिम सामना
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून यादरम्यान इंग्लंडच्या के ओव्हल या मैदानावर खेळला जाणार आहे. डब्ल्यूटीसी (WTC) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याची ही भारताची सलग दुसरी वेळ आहे. आता या सामन्यात भारतीय संघ विजयी होतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video : चाहत्यांनी ‘कोहली-कोहली’ म्हणताच नवीनची रिऍक्शन व्हायरल; पराभवानंतर म्हणाला, ‘मला तर खूपच…’
तोंड उघडे करून निवांत झोपलेला तिलक, सूर्याने लिंबू पिळताच झोपेला लागला चुना; Video जोरात व्हायरल