प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात गुरुवारी (15 डिसेंबर) उपांत्य फेरीचे सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात जयपुर पिंक पँथर्सने बेंगलोर बुल्सचा 49-29 असा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत जागा मिळवली. तर, अत्यंत उत्कंठावर्धक झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुणेरी पलटणने तमिल थलायवाजचा 39-37 असा नजीकचा सामन्यात पराभव करत पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली.
Waqt badal diya
Jazbaat badal diye
Game ka rukh badal diya 👊Paltan turned the game on its head in the last few minutes to make a strong comeback and earn a spot in the Season 9 Final 🙌#vivoProKabaddi #FantasticPanga #PUNvCHE #vivoPKLPlayoffs #vivoPKL2022Playoffs pic.twitter.com/E8cOJUZ2kC
— ProKabaddi (@ProKabaddi) December 15, 2022
मुंबई येथील एनएससीआय येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये दुसरा उपांत्य सामना पुणेरी पलटण व प्रथमच उपांत्य फेरीचा प्रवास केलेल्या तमिल थलायवाज यांच्या दरम्यान झाला. अजिंक्य पवार व नरेंदर गेहलोत यांनी रेडींग मध्ये शानदार खेळ करत पहिल्या हाफमध्ये तमिल थलायवाजला 21-15 अशा आघाडीवर नेले. मात्र, पुणेरी पलटणने उत्कृष्ट सांघिक खेळ करत सामन्यात पुनरागमन केले. फझल व अबिनेश यांनी डिफेन्समध्ये दमदार खेळ दाखवला. प्रमुख रेडर्सच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या पुणे संघासाठी या महत्त्वाच्या सामन्यात पंकज मोहिते याने सर्वोच्च कामगिरी करून दाखवली. त्याने सामन्यात बरोबरी साधून दिल्यानंतर दोन मल्टी पॉईंट रेड करत सामना पुणे संघाच्या बाजूने झुकवला. अखेरीस त्याच्या 16 गुणांसह पुणे संघाने सामना 39-37 असा सामना आपल्या नावे केला. यासह पुणेरी पलटण प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाली.
𝙏𝙧𝙞𝙣𝙜 𝙩𝙧𝙞𝙣𝙜…☎️
Panthers, it's a call from the 𝙎𝙚𝙖𝙨𝙤𝙣 9 𝙁𝙞𝙣𝙖𝙡 for you 🤩#vivoProKabaddi #FantasticPanga #JPPvBLR #vivoPKLPlayoffs #vivoPKL2022Playoffs #JaipurPinkPanthers pic.twitter.com/rykUkaz8Wk
— ProKabaddi (@ProKabaddi) December 15, 2022
तत्पूर्वी, दिवसातील पहिल्या उपांत्य सामन्यात जयपुर पिंक पँथर्सने बेंगलोर बुल्सचा पाडाव केला. अजित कुमारने रेडिंगमध्ये 13 तर साहूल कुमारने डिफेन्समध्ये तब्बल 10 गुण घेत जयपूरचा विजय सुकर केला. यासह जयपूर चौथ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. त्यांनी स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद आपल्या नावे केले होते. स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (19 डिसेंबर) खेळला जाईल.
(Pro Kabaddi 2022 Puneri Paltan And Jaipur Pink Panthers Entered In Finals)