पुणे, २१ सप्टेंबर २०२२: विवो प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे संयोजक मशाल स्पोर्ट्स यांनी नवव्या मौसमाच्या पहिल्या सत्राचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बंगळुरू येथील श्री कांतिवीरा इंडोर स्टेडियम येथे ७ ऑक्टोबरपासून पहिले सत्र सुरु होणार असून पुण्यातील बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुलात (बॅडमिंटन हॉल) २८ऑक्टोबरपासून स्पर्धेचा उत्तरार्ध पार पडणार आहे.
या मौसमात प्रो कबड्डी लीगमध्ये चाहत्याना पुन्हा थेट स्टेडियम मध्ये हजर राहता येणार आहे. भव्य उदघाटन सोहळ्यानंतर क्रीडा प्रेमींना पहिल्या तीन दिवसांतच तिहेरी सामन्यांचा आनंद घेता येणार आहे. पहिल्या ६६ सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये पहिल्या दोन दिवसातच सर्व १२ संघ मैदानावर उतरणार आहेत. इतकेच नव्हे तर प्रो कबड्डी लीगच्या साखळी फेरीत दार शुक्रवार व शनिवारी तीन-तीन सामने रंगणार आहेत.
उदघाटनाची पहिल्याच दिवशी गतविजेता दबंग दिल्ली विरुद्ध यु मुंबा हि लढत ७ ऑक्टोबर रोजी होणार असून त्याच दिवशी दुसरा सामना बंगळुरू बुल्स विरुद्ध तेलगू टायटन्स यांच्यात तर तिसरी लढत युपी योद्धाज विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स यांच्यात होणार आहे.
दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक ऑक्टोबर अखेर जाहीर करण्यात येणार असून त्यामुळे पहिल्या सत्रातील कामगिरीच्या आधारावर सर्व संघांना डावपेचात बदल करता येणार आहे.
यावेळी बोलताना मशाल स्पोर्ट्सचे क्रीडा विभाग प्रमुख व प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी म्हणाले की, “लीगच्या नवव्या मौसमात कबड्डी विश्वातील सर्वोत्तम गुणवत्तेचे दर्शन क्रीडा प्रेमींना होणार आहे. आमचे सर्व सहभागी १२ संघ आमच्या थेट प्रक्षेपणासाठी भागीदारी करणारे प्रायोजक, स्टेडियममध्ये येणारे व टेलिव्हिजनवरून पाहणारे लाखो चाहते या सर्वांच्या सहकार्याने आम्ही नवनवे मानदंड प्रस्थापित करू असा मला विश्वास वाटतो.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
“रिषभला तुम्ही कसे बाहेर बसवू शकता?”; दिग्गजाचा संघ व्यवस्थापनाला सवाल
काय ही गोलंदाजी? एका वर्षात हर्षलची झालीये जोरदार धुलाई; वाचा संपूर्ण आकडेवारी
पुन्हा बदलले गेले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे ठिकाण! लॉर्ड्स नव्हेतर या मैदानावर होणार सामना