Pro Kabaddi 2023: प्रो कबड्डी 2023 स्पर्धेत सोमवारी (दि. 4 डिसेंबर) दोन सामने खेळले गेले. यातील दिवसाचा दुसरा आणि स्पर्धेचा सहावा सामना बेंगळुरू बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स संघात खेळला गेला. हा सामना बंगालने 32-30ने आपल्या नावावर केला. या विजयात बंगालसाठी कर्णधार मनिंदर सिंग आणि श्रीकांत जाधव यांनी मोलाचा वाटा उचलला. हा प्रो कबड्डी 10 स्पर्धेतील बेंगळुरू बुल्सचा सलग दुसरा पराभव ठरला.
या सामन्यात बंगाल वॉरियर्स (Bengal Warriors) संघासाठी सर्वाधिक रेड पॉईंट्स मनिंदर सिंग (Maninder Singh) याने मिळवले. त्याने 10 रेड पॉईंट्स मिळवले. तसेच, डिफेन्समध्ये शुभम शिंदे याने सर्वाधिक 4 पॉईंट्स मिळवले. दुसरीकडे, बेंगळुरू बुल्स (Bengaluru Bulls) संघासाठी भरतने रेडिंगमध्ये सर्वाधिक 6 पॉईंट्स मिळवले आणि डिफेन्समध्ये विशाल लाथेरने 4 टॅकल पॉईंट्स मिळवले.
पहिल्या हाफमध्ये बंगाल वॉरियर्स संघाने बेंगळुरू बुल्सविरुद्ध 14-11ने आघाडी घेतली होती. सामना वेगाने पुढे गेला नाही आणि याचे मुख्य कारण होते की, बंगालच्या डिफेंडर्सने बुल्सच्या भरतला लय मिळू दिली नाही. बुल्सने पहिल्या हाफमध्ये रेडिंग आणि डिफेन्समध्ये प्रत्येकी 5 गुण मिळवले. दुसरीकडे बंगालने रेडिंगमध्ये 8 आणि डिफेन्समध्ये 6 गुण मिळवले. कर्णधार मनिंदर सिंगने आपल्या संघाला महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.
बंगाल वॉरियर्सने दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासूनच आपले नियंत्रण कायम ठेवले आणि बुस्लला ऑल आऊट करत आपली आघाडी वाढवली. यादरम्यान भरतने पुनरागमन केले आणि बुल्सने बंगालवर दबाव बनवला. बुल्सेनही बंगालला ऑल आऊट करत सामना रोमांचक बनवला. सामन्याच्या अखेरच्या रेडपूर्वी स्कोर 31-30 असा होता आणि रेड करण्यासाठी बुल्सकडून भरत आला होता.
बुल्सचा सलग दुसरा पराभव
भरतला सामना बरोबरीत सोडवण्यासाठी एक पॉईंट आणि बुस्लला विजय मिळवून देण्यासाठी दोन पॉईंट्सची गरज होती. मात्र, तो पूर्णपणे अपयशी ठरला. तसेच, शुबम शिंदने टॅकल करत बुस्लच्या अपेक्षांवर पाणी फेरले. बंगालने अंतिम रेडमध्ये रोमांचक विजय मिळवून दिला. त्यामुळे बुल्सला प्रो कबड्डी 2023 स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.
पुढील सामने
गुणतालिकेत बंगाल वॉरियर्स 5 गुणांसह पाचव्या स्थानी आणि बुल्स संघ 2 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. बंगालचा प्रो कबड्डी 2023 स्पर्धेतील पुढील सामना 7 डिसेंबर रोजी जयपूर पिंक पँथर्स संघाविरुद्ध होणार आहे. तसेच, बेंगळुरू बुल्स संघाचा पुढील सामना शुक्रवारी (दि. 8 डिसेंबर) दबंग दिल्लीविरुद्ध खेळायचा आहे. (pro kabaddi 2023 bengaluru bulls vs bengal warriors 6th match bengal won pkl 10 )
हेही वाचा-
PKL 10: अस्लमच्या नेतृत्वाखाली पुणेरी पलटणचा दणदणीत विजय, गतविजेत्या पँथर्सला 37-33ने चारली पराभवाची धूळ
PKL 2023: नवीनचा सुपर 10 व्यर्थ, Dabang Delhiचा दारुण पराभव; Thalaivasच्या उपकर्णधाराने मिळवले 21 पॉईंट्स