PKL 2023: प्रो कबड्डी लीग 2023 स्पर्धेत आतापर्यंत 17 सामने पार पडले आहेत. स्पर्धेचा 17वा सामना रविवारी (दि. 10 डिसेंबर) पार पडला. या सामन्यात दबंग दिल्ली विरुद्ध हरियाणा स्टीलर्स आमने-सामने होते. या सामन्यात हरियाणाने 35-33ने विजय मिळवला. 2 गुणांच्या फरकाने विजय मिळवताच स्पर्धेतील हरियाणाचा हा सलग दुसरा विजय ठरला. दबंग दिल्ली केसी संघाचा 3 सामन्यांतील दुसरा पराभव ठरला.
या सामन्यात हरियाणी स्टीलर्स (Haryana Steelers) संघासाठी रेडिंगमध्ये सिद्धार्थ देसाई (Siddharth Desai) याने सर्वाधिक 10 रेड गुण मिळवले. तसेच, डिफेन्समध्ये मोहित नंदल आणि मोहित यांनी प्रत्येकी 3 टॅकल गुण मिळवले. दबंग दिल्ली (Dabang Delhi) संघासाठी कर्णधार नवीन कुमार (Naveen Kumar) याने रेडिंगमध्ये 16 गुण मिळवले आणि डिफेन्समध्ये हिम्मतने 3 गुण मिळवले.
रोमांचक सामन्यात दिल्लीचा पराभव
पहिल्या हाफनंतर दबंग दिल्लीने हरियाणा स्टीलर्सवर 21-17ने आघाडी घेतली होती. दिल्लीने सामन्याची सुरुवात जबरदस्त अंदाजात केली. तसेच, हरियाणाला पुनरागमनाची संधी दिली नाही. त्यामुळे दिल्लीने हरियाणाला लवकरच सर्वबाद केले. पहिल्या 10 मिनिटात हरियाणाचा डिफेन्स कमाल करू शकला नाही. त्यांनी जे 4 गुण मिळवले, ते सर्व रेडिंगमध्ये आले. डिफेन्समुळे सामन्यात ते जास्तच मागे पडले. 11व्या मिनिटाला अखेरीस मीतूला बाद करत हरियाणाने डिफेन्समध्ये आपले खाते उघडले. त्यासोबतच हरियाणाने सामन्यातही पुनरागमन केले.
विनयने जबरदस्त सुपर रेड मारत विशाल, योगेश आणि मोहितच्या रूपात तीन डिफेंडर्सला बाद केले. त्यामुळे दिल्लीवर सर्वबाद होण्याचे संकट उभ राहिले होते. पुन्हा एकदा नवीनने त्याच्या संघाला वाचवले, पण 19व्या मिनिटाला सिद्धार्थ देसाईने दिल्लीच्या उरलेल्या 2 डिफेंडर्सला बाद करत सामन्यात पहिल्यांदा सर्वबाद केले. त्यामुळे पहिल्या हाफनंतर दोन्ही संघांतील अंतर 4 गुणांचे राहिले होते.
हरियाणाने दुसऱ्या हाफची सुरुवात चांगली केली. पहिल्यांदा त्यांनी स्कोर बरोबरीत आणला आणि त्यानंतर सिद्धार्थने 25व्या मिनिटाला दिल्लीच्या उरलेल्या 2 डिफेंडर्सला बाद करत संघाला दुसऱ्यांदा सर्वबाद केले. नवीनने त्याचा सुपर 10 पूर्ण केला, पण हरियाणाने चांगल्याप्रकारे आघाडी कायम ठेवली. सिद्धार्थनेही फॉर्ममध्ये पुनरागमन केले आणि त्यांना रोखण्यात दिल्लीचा डिफेन्स यशस्वी झाला नाही. अखेरच्या 9 मिनिटात दोन्ही संघातील अंतर फक्त 4 गुणांचे राहिले होते.
सिद्धार्थ देसाईने त्याचा सुपर 10 पूर्ण केला. नवीन चुकीच्या वेळी टॅकल झाल्यामुळे दिल्लीला मोठे नुकसान झाले. 38व्या मिनिटाला दिल्लीने सिद्धार्थ देसाईला बाद करत नवीनला परत मिळवले. नवीनने येताच तीन रेडमध्ये तीन डिफेंडर्सला बाद करत हरियाणाला सर्वबाद होण्याकडे ढकलले. अखेरच्या मिनिटात दोन्ही संघांमध्ये फक्त 2 गुणांचे अंतर होते. यावेळी आशिषने सलग रेड मारत गण मिळवले आणि हरियाणाला सर्वबाद होऊ दिले नाही. त्याने आघाडीही कायम ठेवली.
सामन्याच्या शेवटच्या रेडमध्ये हरियाणा फक्त एक गुण पुढे होता आणि आशिषने एक गुण मिळवत संघाला 2 गुणांनी रोमांचक विजय मिळवून दिला. हरियाणा स्टीलर्सचा हा प्रो कबड्डी 2023 (Pro Kabaddi 2023) स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला, तर दिल्लीला फक्त एक गुणाचे समाधान मानावे लागले.
या विजयासह हरियाणा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी पोहोचला, तर दिल्ली संघ सातव्या स्थानी घसरला. (pro kabaddi 2023 dabang delhi kc vs haryana steelers 17th match pkl 10 naveen kumar super 10 wasted read here)
हेही वाचा-
PKL 2023: कर्णधार मनिंदरच्या सुपर 10मुळे बंगालचा थलायवाजवर रोमांचक विजय, गुणतालिकेत मिळवला ‘हा’ नंबर
PKL 2023मध्ये ‘डुबकी किंग’ ने घडवला इतिहास, यूपीचा हरियाणाविरुद्ध 30 गुणांनी रोमांचक विजय