---Advertisement---

प्रो कबड्डी: नवीनचा झंझावात कायम! दिल्लीचा विजयी चौकार; जयपूर-बंगालचे शानदार विजय ‌

On: शनिवार, ऑक्टोबर 15, 2022 10:56 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात (Pro Kabaddi) शनिवारी (15 ऑक्टोबर) तीन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने गुजरात जायंट्सला 25-18 अशा फरकाने पराभूत केले. दिवसातील दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या दिल्लीने आपली झंझावाती कामगिरी कायम राखत सलग चौथा विजय संपादन केला. त्यांनी तेलगू टायटन्सला 46-26 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. तर, दिवसातील अखेरच्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने पटना पायरेट्सला अक्षरशः निष्प्रभ करत 54-26 अशी मात दिली. बंगालने मिळवलेला हा विजय या हंगामातील सर्वात मोठा विजय ठरला.

दिवसातील पहिला सामना जयपुर पिंक पँथर्स व गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान झाला. सलग तिसऱ्या विजयाच्या आशेने मैदानात उतरलेल्या जयपुरने खेळही तसाच दाखवला. भवानी राजपूत व अर्जुन देशवाल यांनी रेडिंगमध्ये 9 गुण कमावले. गुजरातसाठी प्रतीक दहिया अवघडता इतर सर्वांना अपयश आले. त्यामुळे अखेरीस गुजरातला 25-18 असा पराभव पत्करावा लागला.

दिवसातील दुसऱ्या सामन्यात गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गतविजेत्या दबंग दिल्लीने या सामन्यावर अक्षरशः वर्चस्व गाजवले. नवीन कुमारने 12 व मनजितने 9 गुण घेत रेडिंगचे नेतृत्व केले. तसेच डिफेन्समध्ये सर्वच खेळाडूंनी योगदान दिल्याने दिल्लीचा सलग चौथा विजय सार्थ झाला. यासह त्यांनी गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले.

 

दिवसातील तिसऱ्या सामन्यात सुपर फॉर्ममध्ये असलेल्या बंगाल वॉरियर्सला पटना पायरेट्स आव्हान देऊ शकले नाहीत. मनिंदर सिंग व श्रीकांत जाधव यांनी जोरदार आक्रमण करत पहिल्याच सत्रात संघाला 26-11 अशी आघाडी मिळवून दिली होती. पहिल्या सत्रातील अपयशानंतर पटना संघ सावरला नाही. बंगालचे सर्व रेडर्स व डिफेंडर्स दुसऱ्या सत्रात अक्षरशः पटना संघावर तुटून पडले. पूर्ण वेळेनंतर त्यांनी 54-26 अशी तब्बल 28 गुणांची आघाडी घेत विजय साजरा केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---