प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात मंगळवारी (13 डिसेंबर) एलिमिनेटर सामने खेळले गेले. दिवसातील पहिला एलिमिनेटर सामना अत्यंत एकतर्फी झाला. बेंगलोर बुल्सने गतविजेत्या दबंग दिल्लीला 56-24 अशा मोठ्या फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली. तर, दुसरा एलिमिनेटर सामना कमालीचा चुरशीचा झाला. पहिल्यांदाच प्ले ऑफ्सपर्यंत पोहोचलेल्या तमिल थलायवाज व युपी योद्धाज यांच्यातील हा सामना पूर्ण वेळेनंतर 36-36 बरोबरीत राहिला. त्यानंतर टाय ब्रेकरमध्ये तमिल संघाने विजय मिळवत उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली.
चार वर्षात प्रथमच एलिमिनेटरपर्यंत पोहोचलेल्या तमिल थलायवाजने सुरुवातीपासून सामन्यावर नियंत्रण ठेवत त्यांनी सातत्याने यूपी संघावर आघाडी मिळवली. नरेंदर गेहलोत व अजिंक्य पवार यांनी रेडिंग तर मोहित व साहिल यांनी डिफेन्समध्ये दम दाखवला. यूपी संघासाठी अनुभवी परदीप नरवाल याने झकास खेळ केला. शेवटच्या 30 सेकंदात त्याने संघाला आघाडीवर देखील नेले. मात्र, नंतर त्याचीच पकड करत तमिलने सामना बरोबरीत आणला. टायब्रेकरमध्ये तमिलने शानदार डिफेन्स करत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत जाण्याचा मान मिळवला.
https://twitter.com/ProKabaddi/status/1602705127798083585?t=rP7Z4xktdxcIprMvbETzLw&s=19
तत्पूर्वी, दिवसातील पहिल्या एलिमिनेटरमध्ये बेंगलोर बुल्सने गतविजेत्या दबंग दिल्ली संघाला अक्षरशः निष्प्रभ केले. पहिल्या चार मिनिटातच त्यांनी दिल्लीला ऑल आउट करत सामन्याची दिशा ठरवली. पहिल्या हाफच्या अखेरीस बेंगलोर संघाकडे 17 गुणांची आघाडी होती. दुसऱ्या हाफमध्ये देखील त्यांनी ही आघाडी उत्तरोत्तर वाढवत 56-24 असा दणदणीत विजय मिळवला. बेंगलोरसाठी कर्णधार विकास कंडोला व भरत हुडा यांनी सुपर टेन पूर्ण केले.
The Bulls go charging on❗
A thumping performance by them at @domeindia takes them through to the semis 💪🏽#vivoProKabaddi #FantasticPanga #BLRvDEL #vivoPKLPlayoffs #vivoPKL2022Playoffs #DomeNSCI pic.twitter.com/RzaKMJUn8j
— ProKabaddi (@ProKabaddi) December 13, 2022
गुरुवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये पहिला सामना जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध बेंगलोर बुल्स असा होईल. तर, दुसरा उपांत्य सामना पुणेरी पलटण विरुद्ध तमिल थलायवाज असा रंगेल. स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (17 डिसेंबर) खेळला जाईल.
(Pro Kabaddi eliminates Tamil Thalaivas and Bengaluru Bulls entered in semis)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“आम्ही रिषभला काहीही बोलत नाही”; टीम इंडियाच्या प्रशिक्षकांचा धक्कादायक खुलासा
अखेर सचिनच्या अर्जुनने ठेवले रणजीच्या रणांगणात पाऊल! संपली तीन वर्षांची प्रतीक्षा