प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाला सुरुवात होऊन १५ दिवस झाले. या मोसमामध्ये काही खेळाडूंनी कामगिरीने दाखवून दिले की आपण उद्याचे सुपरस्टार खेळाडू आहेत. तर काही खेळाडूंना त्यांच्या नावासारखी कामगिरी करता आलेली नाही.
प्रो कबड्डीमध्ये या पाच खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे खेचले आहे.
#१सचिन
गुजरातचा हा खेळाडू या मोसमात कबड्डीला गवसलेला नवीन सुपरस्टार आहे. प्रो कबड्डीमध्ये यंदा पहिल्याच वर्षी खेळताना या खेळाडूने गुजरात संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आपण पाहत आहोत. त्याने खेळलेल्या ६ सामन्यात ६४ रेड करताना ३७ गुण मिळवले आहेत.त्यातील ३३ रेडींगमधील गुण आहेत तर ४ गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले आहेत. त्याने मिळवलेल्या गुणांची संख्या जरी कमी वाटत असेल. पण ज्या सामन्यात त्याने गुण मिळवले ते सामने जिंकणे गुजरात संघाला खूप मदत झाली आहे. गुजरातची घरेलू सामन्यात जी विजयी मालिका चालू आहे त्यात सचिनचा वाटा खूप मोठा आहे.
मागील तीन सामन्यात त्याची कामगिरी पाहू. १ -यु मुंबा विरुद्ध सामन्यात ८ गुण,गुजरातचा विजय. २- दिल्ली विरुद्ध सामन्यात ८ गुण,गुजरातचा विजय. ३-जयपूर विरुद्धच्या सामन्यात ७ गुण गुजरातचा विजय.
#२ विकास कंडोला
हरयाणा स्टीलर्स संघाकडे जाणकार डिफेन्समध्ये सर्वात मजबूत संघ तर रेडीगमध्ये सर्वात कमकुवत संघ म्हणून पाहत होते. पण खेळलेल्या तिन्ही सामन्यात या संघाच्या रेडींगने ही गुण मिळवत सामन्याचा निकाल निश्चित केला आहे. हरयाणाच्या तिन्ही सामन्यात विकासने उत्तम रेडींग करत गुण मिळवले आहेत. पहिल्या यु मुंबा विरुद्धच्या सामन्यात त्याने ६ गुण मिळवले, सामना १गुणाने मुंबा जिंकली. दुसऱ्या सामन्यात गुजरातविरुद्ध ७ गुण मिळवले, सामना बरोबरीत सुटला. तिसऱ्या सामन्यात गुजरात विरुध्द परत झालेल्या सामन्यात ६ गुण मिळवले आणि विजयात मोठा वाटा उचलला.
#३ मोनू गोयत
मागील मोसमात बेंगाल वॉरियर्ससाठी उत्तम करणारा मोनू या मोसमामध्ये पटणा पायरेट्ससाठी देखील उत्तम कामगिरी करत आहे. प्रदीप नरवाल संघात असताना एखाद्या रेडरने आपला ठसा उमटवला असेल तर त्याची कामगिरी किती उच्य दर्जाची असेल.पटणा पायरेट्स या मोसमात असा एकमेव संघ आहे ज्याने एकही सामना गमावला नाही. पहिया तीन सामन्यात प्रदीप नरवाल गुणांचा पाऊस पडत आसताना मोनू देखील उत्त कामगिरी करत होता. पण प्रदीपच्या छायेच्या बाहेर पडायला त्याला जमले नाही. शेवटच्या यु.पी.विरुद्धच्या सामन्यात प्रदीप चांगली कामगिरी करू शकत नव्हता त्यावेळी मोनूने उत्तम कामगिरी करत वाहवाही मिळवली. शेवटचा सामना बरोबरीत सुटला. सामन्यात मोनूने ३३ गुण मिळवले आहेत. पहिल्या तेलगू विरुद्धच्या सामन्यात ८ गुण, पुढील तेलुगू विरुद्धच्या सामन्यात सुपर टेन १० गुण, तिसऱ्या बेंगलूरु बुल्स विरुद्ध ७ गुण. शेवटच्या यु.पी.विरुद्धच्या सामन्यात जेव्हा प्रदीप चांगली कामगिरी करू शकत नव्हता. त्यावेळी ८ गुण .
#४ विशाल भारद्वाराज
तेलुगू टायटन्सचा हा गुणी खेळाडू यंदाच्या वर्षी प्रथमच प्रो कबडीमध्ये खेळतो आहे. त्याच्या डिफेन्समधलं कौशल्याने अनेकांची मने जिंकली. त्याच्या अँकेल होल्डपासून वाचणे अशक्य आहे. पहिल्या सामन्यातील त्याच्या कामगिरीमुळेच तेलुगू टायटन्स विजयी होऊ शकला होता. त्यानंतर देखील त्याने उत्तम कामगिरी केली आहे. परंतु बाकी संघाकडून साथ न लाभल्याने तेलगू संघ सामने गमावत आहे. विशालने खेळलेल्या ८ सामन्यांत २३ गुण मिळवले आहेत.
#५ के. प्रपंजन
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मोसमात यु मुंबा संघात असणाऱ्या या खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली नाही. चौथ्या मोसमात तेलगू संघाने त्याला घेतले पण त्यांनीही संधी दिली नाही.या वर्षी तामिळ थालयइवाज या संघाने करारबद्ध करून नियत सहजी दिली त्यामुळे के. प्रपंजन उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. अजय ठाकूर संघात असताना त्याने रेडींगमध्ये चांगली कामगिरी करत नाव कामवाले.३ सामन्यात १९ गुण त्याने मिळवले आहेत. तिन्ही सामन्यात त्याने तमिळसंघाकडून सराधिक गुण मिळवले आहेत. तिसऱ्या सामन्यात बेंगलूरु बुल्स विरुद्धच्या त्याच्या उत्तम कामगिरीमुळे तामिळ संघाचा विजय झाला. हा विजय तामिळ संघाचा प्रो कबडीमधील पहिला विजय आहे. त्यामुळे के. प्रपंजन याची लोकप्रियता वाढत आहे.