प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी (४ फेब्रुवारी) तीन सामने खेळले गेले. दिवसातील तिसरा सामना पटना पायरेट्स व गुजरात जायंट्स या संघांमध्ये खेळला गेला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात पटनाने ४३-२३ असा दणदणीत विजय साकार केला.
गुणतालिकेत अगदी परस्परविरोधी असलेल्या या संघांमध्ये नेहमीप्रमाणे सामना होण्याची अपेक्षा सर्वांना होती. प्रेक्षकांची ही अपेक्षा या संघांनी पूर्ण केली. सामन्याची सुरुवात वेगवान झाली. पटनाच्या अनुभवी रेडर्स या सामन्यात उत्कृष्ट दाखवला. पहिल्या हाफमध्ये पटनाकडे आघाडी होती.
दुसऱ्या हाफ मध्ये पटना संघाने आपला खेळ आणखी उंचावला. युवा रेडर गुमान सिंग याने दुसऱ्या हाफच्या सुरुवातीस पाच गुणांची रेड करत गुजरात संघाला आणखी मागे टाकले. एकदा मिळालेली मोठी आघाडी त्यानंतर पटना संघाने गमावली नाही. गुजरात संघाने सामन्यात पुनरागमन आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळाले नाही.
तत्पूर्वी, दिवसातील पहिल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स संघाने बंगाल वॉरियर्सला ४६-२९ अशी मात दिली. तर, दिवसातील दुसरा सामना दबंग दिल्ली व बंगलोर बुल्स या आघाडीच्या संघांमध्ये खेळला गेला. ज्यामध्ये अखेरीस ३६-३६ असा टाय प्रेक्षकांना पाहायला मिळाला