---Advertisement---

गुजरातची हरियाणावर पुन्हा सरशी! ३२-२६ ने मिळविला विजय

On: सोमवार, जानेवारी 31, 2022 8:29 PM
hs=rakesh
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या आठवी हंगामातील ८४ व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स व गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले. दोन्ही संघांमध्ये अटीतटीच्या झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सने विजय मिळवला.

सामन्याचा पहिल्या मिनिटापासून सामना रंगतदार बनला. मागील सामन्यात दारूण पराभव झालेल्या गुजरातने या सामन्यात लय पकडली. संघासाठी अजय व प्रदीप या दोन्ही रेडर्सने चमकदार कामगिरी करून दाखवली. डिफेन्समध्ये गिरीश एर्नाक उत्कृष्ट कामगिरी करत होता. पहिल्या हाफच्या अखेरीस गुजरात १९-१२ असा आघाडीवर होता.

दुसऱ्या हाफमध्येही गुजरातने आपल्या खेळात सातत्य राखले. अजय व प्रदीप यांनी वैयक्तिक सुपर टेन पूर्ण केले. हरियाणासाठी कर्णधार विकास कंडोला व मीतू यांनी गुण घेत आघाडी मोठी होऊ दिली नाही. मात्र गुजरात संघाने संयम दाखवला. त्यांनी अखेरच्या तीन मिनिटात खेळ कमालीचा संथ केला. त्यामुळे हरियाणा संघाला ३२-२६ असे पराभूत केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---