---Advertisement---

मनिंदर-नबीबक्षच्या ‘सुपर टॅकल’ने बंगालचा विजयरथ कायम! अटीतटीच्या सामन्यात जयपूरचा पराभव

On: सोमवार, जानेवारी 3, 2022 8:35 PM
bw-jpp
---Advertisement---

बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी (३ जानेवारी) पहिल्या सामन्यात गतविजेता बंगाल वॉरियर्स व‌ प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामातचे विजेते जयपूर पिंक पँथर्स आमने-सामने आले. तुल्यबळ प्रतिस्पर्धीमधील हा सामना चांगलाच रंगला. अखेरीस ३१-२८ अशा फरकाने सामना बंगालने आपल्या नावे केला.

या सामन्याची सुरुवात दोन्ही संघांनी आक्रमक अंदाजात केली. या हाफमध्ये दोन्ही संघांमध्ये काट्याची लढत पाहायला मिळाली. बंगालसाठी कर्णधार मनिंदर सिंग याने ९ तर जयपुरसाठी अर्जुन देशवालने ८ गुण मिळवले. पहिल्या हाफमध्ये बंगालकडे १८-१४ अशी आघाडी होती.

सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी पुन्हा एकमेकांची ताकद आजमावून पाहिली. या हाफमध्ये खेळ काहीसा संथ झाला. मात्र, मनिंदर व अर्जुन आपआपल्या संघासाठी गुण घेत राहिले. नबीबक्ष व मनिंदर यांनी अखेरच्या रेडवर अर्जुन देशवालचे सुपर टॅकल करत सामना ३१-२८ असा जिंकून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---