---Advertisement---

प्रो कबड्डी: दिल्ली पुन्हा डिरेल! जयपूर, यूपी आणि बंगालचे दणदणीत विजय

On: शनिवार, नोव्हेंबर 12, 2022 10:39 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शनिवारी (12 नोव्हेंबर) तीन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने गुजरात जायंट्सचा 46-27 असा दणदणीत पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात युपी योद्धाजने तेलगू टायटन्सला 41-30 अशा फरकाने नमवले. तर दिवसातील तिसऱ्या सामन्यात जयपुर पिंक पँथर्सने दबंग दिल्लीला 57-31 अशा फरकाने माती दिली.

पुण्याजवळील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत तीन सामन्यांचे आयोजन केले गेलेले. दिवसातील पहिला सामना सध्या आऊट ऑफ फॉर्म असलेल्या बंगाल वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. बंगालने या सामन्यात गुजरातला अक्षरशः नामोहरम केले. मनिंदर सिंगने 12 व श्रीकांत जाधवने 10 गुण कमावत बंगालला सामन्यात पुढे नेले. पूर्ण वेळेनंतर त्यांनी 46-27 असा तब्बल 19 गुणांनी विजय संपादन केला.

दिवसातील दुसरा सामना तेलगू टायटन्स आणि युपी योद्धाज यांच्या दरम्यान झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी बरोबरीने सुरुवात केली. तेलगूसाठी सिद्धार्थ देसाईने सुपर टेन लगावला. एकवेळ सामना 23-23 अशा बरोबरीत असताना यूपीसाठी सुरेंदर गिलने रेडींग आणि इतर डिफेंडरने तुफान खेळ दाखवत शेवटी 41-30 असा विजय मिळविला.

दिवसातील अखेरचा सामनाही पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच एकतर्फी झाला. दबंग दिल्ली विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स यांच्यात झालेल्या या सामन्यात जयपूरने एकतर्फी वर्चस्व गाजवले.‌ सुरुवातीपासूनच दिल्लीचा कर्णधार नवीन कुमार याला रोखण्यात यश मिळवले. विजय मालिकने संघासाठी एकट्याने प्रयत्न केले. जयपुरसाठी अर्जुन देशवाल व राहुल चौधरी यांनी सुपर टेन मारत संघाचे नेतृत्व केले. पूर्ण वेळेनंतर जयपूरने 57-31 असा तब्बल 26 गुणांनी विजय साजरा केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---