प्रो कबड्डीमध्ये काल गुजरात फॉरचूनजायन्टस विरुध्द यु मुंबाने सामना हरला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला अनुप कुमारने हजेरी लावली.
या पत्रकार परिषदेतील एका प्रश्नाला उत्तर देताना अनुप म्हणाला,”पूर्ण संघ चांगला खेळ करू शकला नाही. आम्ही आमच्या क्षमतेच्या फक्त १०% खेळ केला.”पुढे बोलताना तो म्हणाला,”नाही ,आम्ही आमच्या क्षमतेच्या १०% देखिल खेळ केला नाही. ”
अनुपला अहमदाबादमध्ये खेळायला आवडते. मागीलवर्षी येथेच विश्वचषकाचा सामना भारताने जिंकला होता. पुढे एका पत्रकाराने त्याला डिवचण्याच्या हेतूने प्रश्न केला आणि विचारले की, आता वातावरण बदलले आहे याचा तुझ्या खेळावर परिणाम झाला का?
याला उत्तर देताना आपल्या हजरजबाबी कौशल्याची चुणूक दाखवत अनुप म्हणाला,”वल्डकप मै भी पेहला मॅच हारे थे” याउत्तराने पूर्ण पत्रकार परिषदेत हशा उडाला. पुढे तो म्हणाला,”जे विश्वचषकात झाले त्याची पुनरावृत्ती आम्ही प्रो कबड्डीमध्ये करू याची मला अशा आहे.”