---Advertisement---

प्रो कबड्डीपटू निलेश शिंदे प्रशिक्षकाच्या भूमिकेत, असा असेल दिल्ली योद्धा संघ

On: मंगळवार, मार्च 17, 2020 1:36 PM
---Advertisement---

घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग २०२० पर्व ३ चा काल १४ मार्च २०२० रोजी कपोलो वाडी हॉल, घाटकोपर येथे पार पडला. घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व तीन मध्ये ३ प्रो कबड्डीपटू निलेश शिंदे प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दिल्ली योद्धा या अमरजीत सिंग यांच्या संघाच्या प्रशिक्षकपदी निलेश शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी पार पडलेल्या लिलावात दिल्ली योध्याने १२ जणांचा संघ निवडला. घाटकोपर विभागातील सचिन पानमंद तर उपनगर विभागातील कुणाल शिंदे ह्या दोन स्टार खेळाडूंना दिल्ली योद्धा संघाने आपल्या संघात घेतले.

निखिल कदम, केतन मापलेकर व कुणाल शिंदे ह्या चढाईपटू सोबत संघात सचिन पानमंद, अशोक चव्हाण, सूरज मोरे यासारखे अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. प्रो कबड्डीत छाप सोडलेला निलेश शिंदे आता घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग मध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दिल्ली योद्धा संघ:
१) निखिल कदम
२) केतन मापलेकर
३) सचिन पानमंद
४) अशोक चव्हाण
५) संजय सावंत
६) आदिनाथ भोकटे
७) कुणाल शिंदे
८) सूरज मोरे
९) सत्यम तावडे
१०) विश्वास सिंग
११) अविरत गुंड
१२) कुणाल दोरगे

प्रशिक्षक: निलेश शिंदे
व्यवस्थापक: सचिन टेमकर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---