---Advertisement---

पुणेरी पलटण विजयी मार्गावर! युवा अस्लम इनामदारची धडाकेबाज कामगिरी

On: रविवार, जानेवारी 9, 2022 8:29 PM
aslam-inamdar
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगमध्ये रविवारी (९ जानेवारी) पहिल्या सामन्यात पुणेरी पलटण व गतविजेते बंगाल वॉरियर्स आमनेसामने आले. सर्वांच्या अपेक्षेपेक्षा पुणे संघाने दमदार प्रदर्शन करून दाखवत सामन्यात ९-२७ असा विजय मिळवला.

सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून पुणे संघाने सामन्यावर पकड मिळवली होती. अस्लम इनामदार व कर्णधार नितीन तोमर यांनी रेडींगमध्ये गुण मिळवले. तर, अविनाश व विशाल भारद्वाज यांनी डिफेन्समध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. पहिल्या हाफमध्ये पुणे संघाने २०-११ अशी मोठी आघाडी मिळवली होती.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला पुणे संघाने बंगालला दुसऱ्यांदा ऑल आउट करत आपली आघाडी आणखी वाढवली. अस्लम इनामदार याने कारकिर्दीतील पहिला सुपर टेन पूर्ण केला. अविनाश याने डिफेन्समध्ये पाच गुणांची कमाई केली. या दणदणीत विजयासह पुणे संघाने गुणतालिकेत आपले स्थान उंचावले. पुणे संघाचा हा सलग दुसरा तर हंगामातील तिसरा विजय आहे. बंगालसाठी आकाश पिकलमुंडे व कर्णधार मनिंदर यांनी एकाकी झुंज दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---