तामिल थलायवाज या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेतील संघाने भारतातील पहिल्या खाजगी कबड्डी अकादमीच्या स्थापनेची नुकतीच घोषणा केली.
कबड्डी खेळात मुळापासून सुधारणा घडवून आणण्यासाठी तामिल थलायवाज आणि जेप्पीयर एज्यूकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने या अकादमीची स्थापना करण्यात आली आहे.
ही अकादमी चैन्नईस्थित जेप्पीयर इंजीनीअरींग कॉलेजच्या आवारात असेल. ज्यामध्ये तामिळनाडू राज्यातील 80 उदयनमुख कबड्डीपटूंना निवड प्रक्रियेद्वारे प्रवेश दिला जाईल. या अकादमी पहिली बॅच जूलै 2018 पासून सुरू होणार आहे.
या अकादमीमधे निवड झलेल्या खेळाडूनां तामिळ थलायवाजच्या कोचिंग स्टाफकडून प्रशिक्षण मिळणार आहे. तसेत निवास, भोजन आणि खेळूंडच्या शिक्षणाचा खर्चही हि अकादमी करणार आहे. ही अकादमी देशातील पहिली निवासी अकादमी ठरणार आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना तामिळ थलायवाज संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरेन डी’सील्वा म्हणाले की, ” आज आपल्याकडे अनेक प्रतिभावान खेळाडू असुनही त्यांना योग्य मार्गदर्शन व अर्थिक कारणांअभावी खेळात पुढे जाता येत नाही. सर्व आत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या आकादमीतून भारतासाठी व प्रो- कबड्डीसाठी सर्वोत्कृष्ट कबड्डीपटू घडविण्याच्या आमचा प्रयत्न आहे.”
या कबड्डी अकादमीसाठी भारतीतील महान कबड्डी प्रशिक्षक काशिनाथ भास्करण यांची संचालक म्हणून त्यांची निवड केली आहे.