---Advertisement---

प्रो कबड्डी: यु मुंबाच्या विजयाची गाडी सुसाट; बंगालच्या विजयात महाराष्ट्राचे अजिंक्य-वैभव हिरो

On: बुधवार, ऑक्टोबर 26, 2022 9:43 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi) नवव्या हंगामात बुधवारी (26 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यु मुंबाने गुजरात जायंट्सला पराभूत करत विजयी मालिका कायम राखली. तर, दिवसातील दुसऱ्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दबंग दिल्लीला पराभूत करत आगेकूच कायम राखली.

 

बेंगळुरू येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मागील काही सामन्यांपासून विजयाची गाडी पकडलेल्या यु मुंबाने गुजरात विरुद्ध सामन्यात नियंत्रित सुरुवात केली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात फारसा वेगवान खेळ न दाखवल्याने पहिल्या सत्रानंतर 16-16 बरोबरी झाली होती. मात्र, मुंबईने दुसऱ्या सत्रात खेळाचा वेग वाढवत आघाडी घेण्यास सुरुवात केली. गुमान सिंग व आपला पहिला सामना खेळत असलेल्या इराणच्या इक्रमी यांनी अनुक्रमे 12 व 10 गुण कमावले. गुजरातसाठी राकेश व्यतिरिक्त कोणीही चमक न दाखवू शकल्याने गुजरातला 29-37 असे पराभूत व्हावे लागले.

दिवसातील दुसऱ्या सामन्यात मागील सामन्यात पहिला पराभव स्वीकारलेल्या दिल्लीची गाडी रुळावर येण्यास वेळ लागला. नवीन कुमारच्या पकडी करत बंगालने सामन्यात वर्चस्व निर्माण केले. सामन्याच्या मध्यावर बंगालकडे दोन गुणांची आघाडी होती. मात्र, बंगालसाठी खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या वैभव गर्जे व अजिंक्य कापरेने शानदार खेळ दाखवत बंगालला विजय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बंगालने सामन्यात 35-30 असा विजय मिळविला. नवीन कुमारने दिल्लीसाठी एकाकी झुंज देत 10 गुण मिळवले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इतिहास कायम राहिला! विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध इंग्लंड नेहमीच होते टाय-टाय फिस्स
टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानाकडे विराटची आगेकूच, सूर्या-बाबरला मागे टाकत नवा खेळाडू दुसऱ्या क्रमांकावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---