प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) एकमेव सामना खेळला गेला. फजल अत्राचली याच्या नेतृत्वातील यु मुंबा संघाने पवन सेहरावत याच्या बेंगलोर बुल्स संघाचे आव्हान पेलले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात यु मुंबाने बेंगलोरला ४५-३४ असे पराभूत करत पहिल्या चारमध्ये प्रवेश केला.
सामन्याचा पहिला हा अत्यंत रोमांचकरित्या खेळला गेला. अजित व अभिषेक या रेडर्सने मुंबई संघाला पहिल्या हाफच्या अखेरीस २२-२० अशी आघाडी मिळवून दिली होती. बेंगलोरसाठी कर्णधार पवन याला भरत यांनी साथ दिली . मुंबईसाठी कर्णधार फजल व रिंकू हे दोन्ही कॉर्नर उत्कृष्ट कामगिरी करत होते.
दुसऱ्या हाफमध्ये मुंबईच्या प्रत्येक खेळाडूने योगदान देत संघाची आघाडी वाढवत ठेवली. दुसरीकडे, बेंगलोर शसाठी पवन व्यतिरिक्त इतर कोणताही खेळाडू प्रभावी वाटत नव्हता. अखेरच्या पाच मिनिटात मुंबईकडे ३५-२८ अशी आघाडी होती. मात्र, अखेरच्या तीन मिनिटात मुंबईने बेंगलोरला पुन्हा एकदा ऑल आऊट केल्याने मुंबईकडे ४१-२९ अशी मोठी आघाडी झाली. पुढच्या रेडमध्ये पवन बाद झाल्याने बंगलोरच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.