---Advertisement---

PKL: यु मुंबा प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर! युपी दुसऱ्या स्थानासह प्ले-ऑफसाठी पात्र

On: गुरूवार, फेब्रुवारी 17, 2022 8:33 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या पंधराव्या हंगामात १२४ वा सामना यु मुंबा व युपी योद्धा या दोन संघांत रंगला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेरीस युपीने ३५-२८ असा विजय मिळवला.

टॉप सिक्स मध्ये आधीपासून असलेल्या यूपी संघाने या सामन्यात वेगवान खेळ केला.  संघाचा प्रमुख रेडर प्रदीप नरवालने सातत्याने एकेरी दुहेरी गुण घेतले. यामुळे मुंबई संघावरील दबाव वाढत गेला. डिफेंडर रिंकू व्यतिरिक्त कोणीही चांगला खेळ दाखवू शकले नाही. पहिल्या हाफमध्ये त्यामुळे यूपी संघाकडे १८-१२ अशी सहा गुणांची आघाडी होती.

दुसऱ्या हाफला सुरुवात होताच मुंबईने वेग पकडला. त्यांनी पहिल्या ८ मिनिटांमध्ये यूपी संघाला ऑल आउट करत २०-२० अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर युपीसाठी सुरेंद्रने सुपर रेड करत संघाला आघाडी मिळवून दिली. तरीही मुंबई संघ हार मानण्यास तयार नव्हता. ते सातत्याने प्रदीप नरवाल याला मैदानाबाहेर ठेवण्यात यशस्वी ठरत होते. अखेरच पाच मिनिटे शिल्लक असताना मुंबईकडे एका गुणांची आघाडी होती. त्यानंतर यूपीने मैदानात उतरवलेल्या श्रीकांत जाधव यांनी गुंठ्यात संघाला दोन गुणांची आघाडी मिळवून दिली. डिफेन्सने मुंबईचा प्रमुख रेडर अजित याला बाद करत आघाडी वाढवली. अखेरच्या क्षणापर्यंत युपीने संयम राखत मोठ्या विजयाची नोंद करत प्ले ऑफमध्ये जागा मिळवली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---