---Advertisement---

दबंग दिल्लीने पहिल्यांदाच जिंकले प्रो कबड्डीचे विजेतेपद, पाहा आत्तापर्यंतचे विजेते आणि उपविजेते संघ

On: शनिवार, फेब्रुवारी 26, 2022 11:59 AM
Dabang-Delhi
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१-२२ हंगामाची (Pro Kabaddi 8) शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) सांगता झाली. शुक्रवारी दबंग दिल्ली आणि पटना पायरेट्स (Dabang Delhi K.C. vs Patna Pirates) या दोन संघात अंतिम सामना खेळवण्यात आला. शेवटच्या क्षणांपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात दबंग दिल्लीने विजय मिळवला आणि प्रो कबड्डीचे आपले पहिले विजेतेपद मिळवले. याबरोबरच दबंग दिल्ली प्रो कबड्डीचे विजेतेपद  (Pro Kabaddi Winner) जिंकणारा सहावा संघ ठरला. 

अंतिम सामन्यात दिल्लीने विजय आणि नवीन कुमार यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर तीन वेळच्या विजेत्या पटना पायरेट्सला ३७-३६ अशा फरकाने पराभूत केले आणि विजेतेपद जिंकले. विजयने १४ आणि नवीनने १३ गुण अंतिम सामन्यात मिळवले. याबरोबरच पटनासाठी सचिनने १० आणि गुमान सिंगने ९ गुण मिळवत चांगली कामगिरी केली होती. पण अखेरच्या क्षणी संघाकडून झालेल्या चूकांमुळे पराभव स्विकारावा लागला.

दरम्यान, या सामन्यावेळी स्टार रेडर नवीन कुमारने प्रो कबड्डीच्या या आठव्या हंगामात आपले २०० रेड पाँइंट्स पूर्ण केले. या हंगामात २०० रेड पाँइंट्स मिळवणारा तो चौथा खेळाडू ठरला. त्यापूर्वी पवन शेरावत (३०४), अर्जून देशवाल (२६७) आणि मनिंदर सिंग (२६२) यांनी हा कारनामा केला आहे. अंतिम सामन्यातही दिल्लीसाठी नवीनने अखेरचा गुण मिळवला आणि पटनाचे विजेतेपदाचे स्वप्न तोडले.

आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा प्रो कबड्डीचे विजेतेपद जिंकण्याचा विक्रम पटनाच्याच नावावर आहे. त्यांनी प्रो कबड्डीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या हंगामात विजेतेपद जिंकले आहे. तसेच जयपूर पिंक पँथर्स, यू मुम्बा, बंगळुरू बुल्स, बंगाल वॉरियर्स आणि दबंग दिल्ली यांनी प्रत्येकी एक वेळा प्रो कबड्डीचे विजेतेपद जिंकले आहे.

प्रो कबड्डीचे आत्तापर्यंतचे विजेते आणि उपविजेते 
पहिला हंगाम 
विजेते – जयपूर पिंक पँथर्स
उपविजेते – यू मुम्बा

दुसरा हंगाम
विजेते – यू मुम्बा
उपविजेते – बंगळुरू बुल्स

तिसरा हंगाम
विजेते – पटना पायरेट्स
उपविजेते – यू मुम्बा

चौथा हंगाम
विजेते – पटना पायरेट्स
उपविजेते – जयपूर पिंक पँथर्स

पाचवा हंगाम
विजेते – पटना पायरेट्स
उपविजेते – गुजरात जायंट्स

सहावा हंगाम
विजेते – बंगळुरू बुल्स
उपविजेते – गुजरात जायंट्स

सातवा हंगाम – 
विजेते – बंगाल वॉरियल्स
उपविजेते – दबंग दिल्ली

आठवा हंगाम –
विजेते – दबंग दिल्ली
उपविजेते – पटना पायरेट्स

महत्त्वाच्या बातम्या – 

भारीच ना! पवन सेहरावत आहे प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचा सर्वोत्तम रेडर, पाहा आतापर्यंतच्या स्टार रेडर्सची यादी

प्रो कबड्डी फायनल : पाटना पायरेट्सला लोळवत दबंग दिल्ली विजयी, प्रथमच पटकावले विजेतेपद

सेमी फायनल २: दबंग दिल्लीपुढे बंगळुरू बुल्सचे नामोहरम, अंतिम सामन्यात पटणा पायरेट्सचे असेल आव्हान 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---