---Advertisement---

नाट्यमयरित्या टाय झाला तमिल-जयपूर सामना; मनजीतची तांत्रिक चूक

---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ५८ व्या सामन्यात हळूहळू लयीमध्ये परतत असलेल्या तमिल थलाइवाज आणि जयपुर पिंक पँथर्स या संघांचा आमना-सामना झाला. तुल्यबळ संघातील हा सामना अत्यंत निकराचा झाला. ज्यामध्ये अखेरीस चाहत्यांना नाट्यमय टाय‌ पाहायला मिळाला.

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये सुरुवात दोन्ही संघांनी अत्यंत संथ केली. मात्र, दोन्ही संघांकडून एकेक गुण घेत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेरीस जयपुर संघाला यामध्ये यश आले व त्यांनी तमिल संघाला ऑल आउट केले. पहिला हाफच्या अखेरीस जयपुर १७-१३ अशा आघाडीवर होता.

दुसऱ्या हाफच्या पहिल्या मिनिटापासून तमिल संघाने वेगवान खेळ दाखवण्यास सुरुवात केली. त्यांनी लवकरच जयपूरला ऑल आउट करत दोन गुणांची आघाडी घेतली. यानंतर तमिल संघाने सामन्याची गती काहीशी कमी केली. त्यांचा संघ बराच वेळ दोन गुणांच्या आघाडीवर खेळत होता. मात्र, अजिंक्य पवारला बाद करत जयपुरने सामन्यात रंगत वाढवली. शेवटच्या एका मिनिटात सामन्यात नाट्यमय वळण आले व सामना ३१-३१ असा टाय झाला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---