Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाट्यमयरित्या टाय झाला तमिल-जयपूर सामना; मनजीतची तांत्रिक चूक

January 16, 2022
in कबड्डी, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/Pro Kabaddi

Photo Courtesy: Twitter/Pro Kabaddi


प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ५८ व्या सामन्यात हळूहळू लयीमध्ये परतत असलेल्या तमिल थलाइवाज आणि जयपुर पिंक पँथर्स या संघांचा आमना-सामना झाला. तुल्यबळ संघातील हा सामना अत्यंत निकराचा झाला. ज्यामध्ये अखेरीस चाहत्यांना नाट्यमय टाय‌ पाहायला मिळाला.

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये सुरुवात दोन्ही संघांनी अत्यंत संथ केली. मात्र, दोन्ही संघांकडून एकेक गुण घेत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेरीस जयपुर संघाला यामध्ये यश आले व त्यांनी तमिल संघाला ऑल आउट केले. पहिला हाफच्या अखेरीस जयपुर १७-१३ अशा आघाडीवर होता.

दुसऱ्या हाफच्या पहिल्या मिनिटापासून तमिल संघाने वेगवान खेळ दाखवण्यास सुरुवात केली. त्यांनी लवकरच जयपूरला ऑल आउट करत दोन गुणांची आघाडी घेतली. यानंतर तमिल संघाने सामन्याची गती काहीशी कमी केली. त्यांचा संघ बराच वेळ दोन गुणांच्या आघाडीवर खेळत होता. मात्र, अजिंक्य पवारला बाद करत जयपुरने सामन्यात रंगत वाढवली. शेवटच्या एका मिनिटात सामन्यात नाट्यमय वळण आले व सामना ३१-३१ असा टाय झाला.


Next Post
rajwardhan-hangargekar

"त्याचे चेंडू म्हणजे बंदुकीच्या गोळ्या"; 'उस्मानाबाद एक्सप्रेस' राजवर्धनचा फॅन बनला किवी दिग्गज

Virat Kohli with Sister and Brother

कोहलीच्या निर्णयावर कुटुंबातून आली प्रतिक्रिया; भाऊ, बहिण म्हणाले, 'आम्ही सदैव तुझ्या पाठिशी'

Sunil-Gavaskar-Rohit-Sharma

गावसकरांना रोहित नव्हे तर 'या' शिलेदारात दिसतोय भावी कसोटी कर्णधार, कारणासहित सांगितले नाव

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143