आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धा समाप्त झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींच्या नजरा आयसीसी वनडे विश्वचषक 2023वर लागल्या आहेत. ही स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये खेळली जाईल. भारतीय संघ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. कारण, भारताने मागील 10 वर्षांमध्ये एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाहीये. अशात वनडे विश्वचषक 2023 च्या वेळापत्रकाविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. एका आघाडीच्या क्रीडा संकेतस्थळाने भारतीय संघ आपले सामने कुठे कुठे खेळणार याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारतात होणारा हा विश्वचषक दहा संघांदरम्यान खेळला जाईल. प्रत्येक संघाला 9 साखळी सामने यादरम्यान खेळण्यास भेटणार आहेत. त्यानंतर दोन उपांत्य सामने व एक अंतिम सामना रंगेल. भारतीय संघ आपले सर्व सामने वेगवेगळ्या मैदानांवर खेळताना दिसेल.
भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल. त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे अफगाणिस्तान व 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ आपले सामने खेळेल. 19 ऑक्टोबर रोजी पुणे येथील एमसीए स्टेडियमवर बांगलादेशशी भारताची लढत होईल. 22 ऑक्टोबर रोजी न्यूजीलंडविरुद्ध धर्मशाला येथे तर 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध लखनऊ येथे भारताचा सामना आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर 2 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ पात्रता फेरीतील संघाविरुद्ध खेळेल. 5 नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डनवर दक्षिण आफ्रिकेशी भारताची झुंज होईल. भारताचा अखेरचा साखळी सामना हादेखील पात्रता फेरीतून पुढे आलेल्या संघाशी 11 ऑक्टोबर रोजी बेंगलोर येथे खेळला जाईल. पात्रता फेरीतून वेस्ट इंडिज, श्रीलंका व आयर्लंड यापैकी दोन संघ पुढे येण्याची शक्यता आहे.
तसेच स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने मुंबई व चेन्नई येथे होऊ शकतात. तर, अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.
(Proabale Team India Timetable For ODI World Cup 2023 Pune Mumbai Host Matches)
महत्वाच्या बातम्या-
कशी नशिबाने थट्टा मांडली! आधी WTC Final गमावली, नंतर टीम इंडियाला बसला 115 टक्के दंडाचा फटका
स्मिथच्या ‘त्या’ कॅचने तोडले 140 कोटी भारतीयांचे हृदय, मान खाली घालून तंबूत परतला विराट- Video