---Advertisement---

धोनीची चेन्नई ठरणार ‘सुपर’ की हैदराबादचा होणार ‘सनराईज’, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

On: बुधवार, एप्रिल 28, 2021 1:46 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा तेविसावा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे होणारा हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. हंगामातील पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईने पुढील सलग ४ सामने जिंकले आहेत. तर हैदराबादला आतापर्यंत केवळ १ सामना जिंकण्यात यश आले आहे. असे असतानाही, चेन्नई आणि हैदराबाद संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात.

चेन्नई संघात अनुभवी शिलेदार रॉबिन उथप्पाला संधी दिली जाऊ शकते. अंबाती रायुडूला बाहेर करत उथप्पाला त्याच्याजागी अंतिम ११ मध्ये खेळवले जाऊ शकते. याबरोबरच जर अष्टपैलू खेळाडू मोईन अली पूर्णपणे तंदुरुस्त असल्यास ड्वेन ब्रावोला बाकावर बसवले जाण्याची शक्यता आहे. याबरोबरच मागील सामन्यात दमदार गोलंदाजी करणाऱ्या इमरान ताहिरला या सामन्यातही संधी दिली जाईल.

दुसरीकडे विजयासाठी आसुसलेला हैदराबाद संघ पुन्हा एकदा मनिष पांडेला आजमावू शकतो. युवा क्रिकेटपटू विराट सिंगला बाहेर करत पांडेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली जाऊ शकते. याखेरीज नुकतेच हैदराबाद संघाकडून पदार्पण केलेल्या केदार जाधवचे खेळणेची जवळपास ठरल्यात जमा आहे. तर अब्दुल समदवर मॅच फिनिशरची जबाबदारी टाकली जाऊ शकते.

चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेइंग इलेवन
ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, एमएम धौनी (कर्णधार), सॅम करन, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर आणि इमरान ताहिर

सनराइजर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेवन
डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरेस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, राशिद खान, जगदीश सुचिथ, खलील अहमद आणि सिद्धार्थ कौल

महत्त्वाच्या बातम्या-

‘भारत देश माझं दुसरं घर आहे, नागरिकांना तडफडताना पाहू शकत नाही,’ भारतीयांना मदत करण्यासाठी समोर आलाय ब्रेट ली

यष्टीमागे समालोचन करण्यात रिषभ बनला मास्टर! लाईव्ह सामन्यात म्हटले असे काही की समालोचकही हसून लोटपोट

DCच्या गोलंदाजाकडून मोठी चूक झाली, नशीब पंचांनी फक्त वॉर्निंग दिली; नाहीतर पूर्ण संघाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---