इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा २८ वा सामना आज (०२ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे दुपारी ३.३० वाजता या सामन्याची सुरुवात होणार आहे. या सामन्यापुर्वी हैदराबाद संघाने कर्णधार डेविड वॉर्नरचा पायउतार करत केन विलियम्सनला नवा संघनायक म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे नव्या कर्णधाराला संघाला त्याचा पहिलाच सामना जिंकवून देण्यात यश येईल का नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशात विलियम्सन काही धाडसी निर्णय घेत संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करु शकतो. वॉर्नरला टी२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट सलामीवीरांमध्ये गणले जाते. आतापर्यंत हैदराबादकडून ६ सामन्यात २ अर्धशतकांसह त्याने १९३ धावाही केल्या आहेत. परंतु टी२० स्वरुपात ५७ चेंडूत शतक झळकावणाऱ्या जेसन रॉयला वॉर्नरच्या जागी सलामीला संधी दिली जाऊ शकते.
अशात राजस्थानविरुद्ध जॉनी बेयरस्टो आणि जेसन रॉयची जोडी डावाची सुरुवात करताना दिसू शकते. याबरोबरच अष्टपैलू केदार जाधव आणि अब्दुल समद यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
दुसरीकडे हंगामातील तिसरा विजय नोंदवण्याच्या हेतूने सॅमसनचा राजस्थान संघ मैदानावर उतरेल. अशात मागील सामन्यातील अंतिम ११ खेळाडूंनाच संघात जागा दिली जाऊ शकते.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, शिवम दुबे, रियान पराग, डेविड मिलर, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल/जयदेव उनाडकट, मुस्तफिजुर रेहमान आणि चेतन सकारिया
सनराइजर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
डेविड वॉर्नर/जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, केन विलियम्सन, विजय शंकर, केदार जाधव/अब्दुल सामद, राशिद खान, जगदीश सुचिथ, सिद्धार्थ कौल, खलील अहमद आणि संदीप शर्मा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई-चेन्नई सामन्यात कायरन पोलार्ड आणि सॅम करनमध्ये चकमक, डोळे वटारत काढली खुन्नस
कृणालच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे चेंडू सीमापार, मग काय गोलंदाज बोल्टचा चढला पारा; बघा व्हिडिओ